नाशिक | प्रतिनिधी | Nashik
नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहातून (Nashik Road Central Jail) एक खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. जव्हार पोलिस ठाण्यात (Jawhar Police Station) दाखल असलेल्या खून, बलात्कार आणि पोक्सोसारख्या गंभीर गुन्ह्यात जन्मठेपेची शिक्षा भोगणारा कैदी शंकर काशिनाथ भोगाडे (वय ३२) याने मंगळवारी सायंकाळी कारागृहात गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेने खळबळ उडाली असून, नाशिकराेड पोलिसांना (Nashik Road Police) एक सुसाईड नोट सापडली आहे, ज्यामध्ये एका महिलेचा उल्लेख असल्याने या प्रकरणाला आता वेगळे वळण मिळाले आहे.
शंकर हा गेल्या काही वर्षांपासून जन्मठेपेची शिक्षा भोगत होता. काही काळापूर्वी तो मंजूर (Bill) पॅरोलवर कारागृहाबाहेर गेला होता, मात्र मुदत संपल्यानंतरही तो परतला नाही. तब्बल दीड वर्ष तो पोलिसांना गुंगारा देऊन फरार होता. जव्हार पोलिस त्याचा कसून शोध घेत असताना, अवघ्या ५ ते ७ दिवसांपूर्वी त्याला त्याच्या जुन्या कामाच्या ठिकाणाहून अटक करण्यात आली होती. अटकेनंतर त्याची रवानगी पुन्हा नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली होती.
हे देखील वाचा : Ashok Kharat Crime News : ज्या कार्यालयात महिलांसोबत करायचा अश्लील चाळे SIT ने तेच केले सील; लिंगपिसाट खरातला दणका
मंगळवारी सायंकाळी कारागृहातील दैनंदिन कामकाज सुरू असताना शंकरने कैद्यांच्या वस्त्र भांडारात जाऊन गळफास घेतला. कारागृह प्रशासनाच्या निदर्शनास ही बाब येताच त्यांनी तातडीने त्याला जिल्हा रुग्णालयात (Civil Hospital) हलवले. मात्र, वैद्यकीय अधिकारी डॉ. सुहास विभूते यांनी त्याला तपासून मृत घोषित केले तपास सहायक निरीक्षक प्रविण सूर्यवंशी करीच असून मृतदेह शवविच्छेदनासाठी धुळे येथे पाठविण्यात आला आहे. कारागृह प्रशासनाच्या सुरक्षेवर या घटनेमुळे पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत.
हे देखील वाचा : Ashok Kharat Crime News : पाप झाकण्यासाठी खरातचा नीच डाव! पीडितेची ढाल करत ऑफिसबॉयला बनवले ‘बळीचा बकरा’
‘तो’ खळबळजनक दावा
पोलिसांना तपासादरम्यान शंकरकडे एक चिठ्ठी सापडली आहे. या सुसाईड नोटमध्ये त्याने कृत्याबद्दल आई-वडिलांची माफी मागितली आहे. विशेष म्हणजे, त्याने मृत्यूला एका महिलेला जबाबदार धरले असून तिचे नावही चिठ्ठीत नमूद केले आहे. “या कृत्यासाठी कारागृहातील कोणालाही दोषी धरू नये,” असेही त्याने स्पष्ट केले आहे. या दाव्यामुळे आता ती महिला कोण आणि तिचा या प्रकरणाशी काय संबंध, याचा शोध पोलिस घेत आहेत.




