नाशिक | प्रतिनिधी | Nashik
स्वतःला कॅप्टन म्हणवून घेणारा आणि अंकशास्त्राच्या नावाखाली महिलेला जाळ्यात ओढणारा ‘चमत्कारी’ अशोककुमार एकनाथ खरात (Ashok Kharat) उर्फ कॅप्टन याच्या पाशवी कृत्याने महाराष्ट्र हादरला आहे. एका ३५ वर्षीय महिलेला गुंगीचे औषध देऊन तिच्यावर अत्याचार केल्याप्रकरणी नाशिक गुन्हे शाखेने (क्राईम ब्रांच) काल (बुधवारी) त्याला अटक केली. यानंतर त्याला न्यायालयात (Court) हजर केले असता न्यायालयाने २४ मार्चपर्यंत पोलीस (Police Custody) कोठडी सुनावली आहे.
खरातच्या अटकेनंतर पोलिसांनी (Police) त्याच्या कॅनडा कॉर्नर परिसरातील ‘ओकस प्रॉपर्टीज’ कार्यालयात छापा टाकला असता या छाप्यात महत्त्वाचे पुरावे आणि ५८ धक्कादायक व्हिडीओ सापडले आहेत. याच कॅनडा कॉर्नर परिसरातील कार्यालयात त्याचा धार्मिक विधीच्या नावाखाली एका महिलेशी अश्लील चाळे करतानाचा व्हिडीओ सापडला. यानंतर तो व्हायरल झाल्यानंतर खरातचे ‘वासनाकांड’ उजेडात आले. त्यामुळे संपूर्ण राज्यात एकच खळबळ उडाली.
हे देखील वाचा : Ashok Kharat Crime News : ‘स्वघोषित कॅप्टन’चा धक्कादायक कांड; ऑफिसबाहेर लोकांच्या रांगा तरीही महिलेसोबत…
अशोक खरातने लष्करी शिस्त आणि अंकशास्त्राच्या नावाखाली राजकीय नेते मंडळींसह प्रशासनातील बडे अधिकारी, खाकी वर्दीतील वरिष्ठांचे भविष्य सांगून गेल्या काही वर्षांत सुमारे २०० कोटींची संपत्ती जमवल्याची माहिती समोर आली आहे. यात नाशिक शहरातील गोविंद नगर परिसरातील एक अलिशान बंगला, कॅनडा कॉर्नर परिसरात ऑफिस, पाथर्डी परिसरात कोट्यावधींची ३० एकर जमीन आणि सिन्नर, ओझर विमानतळ परिसरासह शिर्डीतील कोट्यवधींच्या जमिनीचा समावेश आहे.
दरम्यान, अशोक खरातच्या सिन्नरमधील (Sinnar) मिरगाव येथील फार्म हाऊसची नाशिक पोलिसांकडून रात्री तपासणी करण्यात आली. याशिवाय मिरगावतील इशान्येश्वर मंदिर आणि कुटीयाची देखील झाडाझडती घेण्यात आली. यावेळी तेथील स्थानिकांनी मिरगावातील फार्म हाऊसवर अनेक नेत्यांसह कलाकार मंडळींचा राबता असायचा अशी माहिती पोलीसांना दिल्याचे समजते.
हे देखील वाचा : Ashok Kharat Crime News : आयुष्य उद्ध्वस्त करीन, तुला आणि तुझ्या पतीला ठार मारेल; ‘चमत्कारी’ खरातचा पीडितेला धमकावून वारंवार अत्याचार
कुठे किती संपत्ती?
मिळालेल्या माहितीनुसार, अशोक खरातची पाथर्डीत सर्व्हे क्रमांक ३३, ९३, ९७, १३२, १३८, २०३, २२०, मध्ये ३० एकर जमीन असून, याची किंमत अंदाजे १५० कोटींच्या आसपास असल्याचे बोलले जाते. याशिवाय गौळणे शिवारात त्याने पत्नी कल्पना, मुलगी सृष्टी आणि तृप्तबालाच्या नावे ३० कोटींच्या जमीनीचे खरेदी खत केल्याचे समजते. तर कहांडळवाडी, मीरगाव येथे ४५ एकर जमीन असून याची किंमत साधारणता दोन कोटींच्या आसपास असल्याची माहिती आहे. तसेच मीरगाव येथील मंदिराच्या मागे असलेल्या त्याच्या भव्य फार्महाऊसची किंमत सुमारे १० कोटींच्या जवळपास असल्याचे सांगितले जाते. त्याबरोबरच ईशान्येश्वर मंदिर ट्रस्टची वार्षिक उलाढाल दोन कोटींच्या आसपास आहे. तर ओझर विमानतळाजवळ पाच कोटींची जमीन असून, शहरातील कर्मयोगीनगरच्या आलिशान बंगल्याची किंमत ५ कोटी इतकी आहे. तर कॅनडा कॉर्नरच्या ऑफिसची किंमत १ कोटींच्या जवळपास असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे या सर्व संपत्तीची किंमत सुमारे २०० कोटी रुपयांच्या जवळपास आहे.
हे देखील वाचा : Ashok Kharat Crime News : अत्याचाराचे आरोप असलेल्या अशोक खरातची बड्या नेत्यांसोबत उठबस; फोटो आले समोर




