Thursday, October 1, 2026
Homeक्राईमNashik TCS Case : निदा खानवर अटकेची टांगती तलवार कायम; जामीन अर्जावर...

Nashik TCS Case : निदा खानवर अटकेची टांगती तलवार कायम; जामीन अर्जावर ‘या’ तारखेला सुनावणी

नाशिकरोड | प्रतिनिधी | Nashik Road

टीसीएस कंपनीमध्ये धर्मांतर प्रकरणी संशयित आरोपी असलेल्या निदा एजाज खान (Nida Khan) हिच्या जामीन अर्जावर (Bail Application) आज (सोमवारी) नाशिकरोड येथे न्यायालयात सुनावली झाली. यावेळी आरोपीचे वकील व सरकारी पक्षाकडून इन कॅमेरा युक्तिवाद होऊन जामीन अर्जाबाबत निकाल राखून ठेवण्यात आला आहे.

- Advertisement -

हे देखील वाचा : Nashik TCS Case : चौकशीचा फेरा वाढला; राष्ट्रीय महिला आयोगाची समिती घटनास्थळी

याबाबतचा निकाल (Result) सोमवार (दि.२७) रोजी देण्यात येईल. मात्र, तोपर्यंत निदा खान हिच्यावर अटकेची (Arrested) टांगती तलवार कायम आहे. निदा खान हि तीन महिन्याची गर्भवती असल्याने मानवी हक्काच्या आधारावर तिला अटकेपासून संरक्षण मिळणार की नाही? जामीन होणार का नाही? याकडे लक्ष लागले होते.

हे देखील वाचा : Nashik MLC Election : नाशिक विधान परिषदेचे वाजणार बिगुल; ७५ टक्के मतदारांच्या उपलब्धतेमुळे निवडणुकीचा मार्ग मोकळा

परंतु, आज (सोमवारी) न्यायालयात याबाबत सुनावणी झाली असता न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेत त्या संदर्भातीळ निकाल राखून ठेवला. त्यामुळे याप्रकरणी आता २७ एप्रिल रोजी सुनावणी होणार आहे. दरम्यान आज सुनावणीवेळी न्यायालयात मोठा पोलीस बंदोबस्त होता.

हे देखील वाचा : Rain Update : उत्तर महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता; शहर जिल्ह्यात पावसाचा शिडकावा

ताज्या बातम्या

Nashik Crime News : सिंहस्थाच्या तोंडावर झारखंड गँग नाशिकमध्ये; चोरी, दरोड्याचा...

0
​नाशिक | प्रतिनिधी | Nashik आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक पोलिसांनी (Nashik Police) शहरात सुरू केलेल्या हाय-अलर्ट व विशेष गस्त मोहिमेमुळे एक आंतरराज्यीय गुन्हेगारांटी टोळी...