जेलरोड | प्रतिनिधी | Jail Road
जेलरोड परिसरात (Jail Road Area) मोटारसायकलवरून आलेल्या अज्ञात चोरट्याने (Thieves) ज्येष्ठ महिलेच्या (Woman) गळ्यातील सोन्याची चैन हिसकावून पळ काढल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात (Upnagar Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हे देखील वाचा : Nashik Crime News : नाशिकमध्ये पुन्हा तिहेरी तलाक; पोटच्या गोळ्याचा मृत्यू अन् पत्नीला फोनवरून दिला काडीमोड
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, वत्सला अरुणकुमार मौर्य (वय ६५, रा. अष्टविनायक रो-हाऊस नं. ८, पारिजातनगर, लोखंडेमळा, ओमशांती लॉन्सच्या पाठीमागे, जेलरोड, नाशिकरोड) या ९ मे रोजी रात्री साडेआठच्या सुमारास घरासमोर फेरफटका मारत होत्या. त्यावेळी मोटारसायकलवरून आलेल्या एका अज्ञात इसमाने त्यांच्या जवळ येत अचानक गळ्यातील सोन्याची चैन जबरदस्तीने हिसकावून घेतली.
हे देखील वाचा : Nashik Crime News : घरफोडीत सोन्या-चांदीसह रोख रक्कम लंपास
या चोरीमध्ये (Stolen) सुमारे १ लाख २६ हजार रुपये किमतीची १८ ग्रॅम वजनाची सोन्याची चैन व पेंडंट असा ऐवज चोरट्याने लंपास केला. घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस सीसीटीव्हीच्या आधारे संशयिताचा शोध घेत आहेत.
हे देखील वाचा : Rupali Chakankar : नाशिकमध्ये SIT कडून रुपाली चाकणकरांची कसून चौकशी; अशोक खरात प्रकरणावर दिली पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या…





