Tuesday, April 7, 2026
Homeक्राईमNashik Crime News : पार्किंगचा वाद विकोपाला; धारदार शस्त्राने वार करुन तरुणाचा...

Nashik Crime News : पार्किंगचा वाद विकोपाला; धारदार शस्त्राने वार करुन तरुणाचा खून

एक गंभीर जखमी, संशयित आरोपी जेरबंद

सिन्नर | वार्ताहर | Sinnar

शहरातील परिट गल्ली परिसरात किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून धारदार शस्त्राने वार करून एका तरुणाचा खून (Youth Murder) झाल्याची घटना रविवारी (दि. २९) रात्री १० वाजेच्या सुमारास घडली. गौरव दशरथ जाधव (३९) असे मृत तरुणाचे नाव आहे. या घलेत तरुणाचा भाऊही गंभीर जखमी झाला. यावर सिन्नर पोलिसांनी (Sinnar Police) तत्पर कारवाई करत आरोपीला तात्काळ अटक केली आहे.

- Advertisement -

हे देखील वाचा : Nashik Crime : सोन्या-चांदीच्या दुकानाचे शटर फोडले; चोरट्यांनी तब्बल ‘इतक्या’ लाखांचा ऐवज केला लंपास

परिट गल्ली येथे राकेश दशरथ जाधव (३६) व गौरव दशरथ जाधव (३९) या दोघा भावांचा त्यांच्या शेजारी व नातेवाईक असलेल्या बंडु अशोक जाधव याच्यासोबत मोटारसायकल पार्किंगच्या कारणावरून वाद झाला. हा वाद चिघळून बंडु जाधव याने धारदार शस्त्राने राकेश व गौरव यांच्यावर वार करत त्यांना गंभीर जखमी केले घटनेनंतर दोन्ही जखमीना तात्काळ सिन्नर येथील रुग्णालयात प्राथमिक उपचार देण्यात आले. पुढील उपचारासाठी त्यांना नाशिक येथे हलविण्यात आले. मात्र, गौरव दशरथ जाधव यांबा जिल्हा शासकीय स्णालय येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला.

हे देखील वाचा : Nashik Crime News : राम रथ यात्रेत चोरट्यांचा सुळसुळाट; गर्दीत १० भाविकांचे लाखो रुपयांचे दागिने लंपास

राकेश जाधव यांच्यावर नाशिक येथील खाजगी रुग्णालयात (Private Hospital) उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच सिन्नर पोलीस ठाण्याचे (Sinnar Police Station) पोलीस निरीक्षक हेमंतकुमार भामरे यांनी तात्काळ तपास पथक गठीत करून घटनास्थळी पाठवले. पोलिसांनी हॉस्पिटलमध्ये जाऊन जखमी राकेश जाधव यांचा जबाब नॉवला. त्यानुसार आरोपी बंडु अशोक जाधव (४२) रा. परिट गल्ली याच्याविरुद्ध सिन्नर पोलीस ठाण्यात खून व खूनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला.

हे देखील वाचा : Nashik News : नाशिकच्या चाकांना युद्धाची झळ! इंधन टंचाई, किंमत वाढीच्या नावाखाली प्रवाशांच्या खिशाला ‘कात्री’

दरम्यान, आरोपी घटनास्थळावरून फरार झाला होता. मात्र, पोलीस निरीक्षक यांच्या भामरे मार्गदर्शनाखाली विविध पथके तयार करून तांत्रिक व मानवी माहितीच्या आधारे शोधमोहीम राबविण्यात आली. अखेर पोलिसांनी आरोपीचा माग काढत त्याला अल्पावधीत अटक करण्यात यश मिळवले. ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक रमेश पाटील, संजय गोसावी, अंमलदार व कर्मचारी यांच्या पथकाने केली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पाटील करीत आहेत.

हे देखील वाचा : Ashok Kharat Crime News : खरातने यूट्यूबर्सनाही केले मालामाल; कर्जदारांमध्ये खुशीची लहर

ताज्या बातम्या

Ashok Kharat Case : भोंदू खरात महिलांना जाळ्यात कसा ओढायचा? ...

0
नाशिक | Nashik भोंदूगिरीच्या नावाखाली महिलांचे लैंगिक शोषण करणाऱ्या अशोक खरात प्रकरणात दररोज नवनवे खुलासे होत आहेत. या प्रकरणाचा तपास एसआयटी करत असून, खरातविरोधात मनी...