नाशिक। प्रतिनिधी | Nashik
म्हाडाच्या बहुचर्चित जमीन फसवणूक प्रकरणाने (MHADA Land Fraud) आता गंभीर वळण घेतले आहे. या प्रकरणातील काही संशयितांची नावे वगळण्यासाठी भूमी अभिलेख कार्यालयाकडून पोलिसांवर दबाव टाकला जात असल्याची चर्चा होती, मात्र पोलिस (Police) प्रशासनाने ही मागणी धुडकावून लावली आहे. “सखोल तपास आणि कागदपत्रांची पडताळणी केल्याशिवाय संशयितांचे नाव कमी होणार नाही,” अशी भूमिका पोलिसांनी घेतल्याने या घोटाळ्याशी संबंधित रॅकेटचे धाबे दणाणले आहेत.
हे देखील वाचा : Nashik Crime : मुलाने जन्मदात्या बापाचा काढला काटा; पोलिसांनी ठोकल्या बेड्या, वडिलांची मृत्युशी झुंज ठरली अपयशी
तपासादरम्यान समोर आलेली नावे आणि कागदपत्रांची सखोल चौकशी यापूर्वीच पूर्ण झाली आहे. तांत्रिक चुकांमुळे एखादे नाव येणे शक्य असले, तरी भूमि अभिलेख कार्यालयाकडून ठराविक नावे वगळण्यासाठी वारंवार होणारा आग्रह आता पोलिसांच्या नजरेत ‘संशयास्पद’ ठरू लागला आहे. या प्रकरणामागे एखादे रॅकेट असण्याची दाट शक्यता असून, पोलिस प्रत्येक तांत्रिक पुराव्याची सूक्ष्म तपासणी करत आहेत. पोलिसांनी घेतलेल्या या आक्रमक पवित्र्यामुळे बांधकाम क्षेत्रातील बड्या धेंडांचे झोप उडाली आहे.
हे देखील वाचा : Nashik Crime : दहा महिन्यांपासून पोलिसांना चकवा; अखेर कुख्यात गुंड पाटणकरच्या मुसक्या आवळल्या
दरम्यान, अटकेच्या भीतीने अनेक मोठ्या बिल्डरांनी न्यायालयाकडे (Court) धाव घेतली आहे. विशेष म्हणजे, सोमवारी आणि मंगळवारी अर्जांचा पाऊस पडल्यानंतर बुधवारी पुन्हा सहा जणांनी जिल्हा न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी (Bail) अर्ज दाखल केले आहेत.
हे देखील वाचा : Ashok Kharat Crime News : ‘स्वघोषित कॅप्टन’चा धक्कादायक कांड; ऑफिसबाहेर लोकांच्या रांगा तरीही महिलेसोबत…
बुधवारी अर्ज केलेले संशयित
जगदीश बलवंत केदार, निर्मला मधुकर वारे, सलिम इब्राहिम कोकणी, नगमा सलिम कोकणी, जगन्नाथ विठ्ठलराव सूर्यवंशी, गायत्री जगन्नाथ सूर्यवंशी
हिट’ लिस्टवर असलेले मुद्दे
- पोलिसांकडून सर्व संशयित नावे आणि त्यांच्याशी संबंधित जमिनीच्या व्यवहारांची कुंडली मांडली जात आहे.
- आता सर्वांच्या नजरा न्यायालयाच्या निर्णयाकडे असून, जामीन फेटाळल्यास मोठी धरपकड होण्याची शक्यता आहे.
हे देखील वाचा : Ashok Kharat Nashik Crime News : शहरात दोन अलिशान बंगले, मिरगावला फार्म हाऊस तर पाथर्डीत ३० एकर…; वासनांध अशोक खरातकडे कोट्यवधींची प्रॉपर्टी
-





