नाशिक | प्रतिनिधी | Nashik
गुन्हेगारी पद्धतीने सोनसाखळी (Gold Chain) ओरबाडून नेण्याचा पूर्वाश्रमीचा ‘दंगल पाटील पॅटर्न’ नाशिक शहरात (Nashik City) पुन्हा सक्रिय झाला आहे. ५६ हून अधिक चेनस्नॅचिंग केल्याप्रकरणात तेव्हा अटकेत असलेला सराईत अभियंता दंगल उर्फ उमेश अशोक पाटील हा इंजिनिअर सध्या तुरुंगात असूनही आता त्याचाच डमी किंवा तिन्हाईत इराणी टोळी चेनस्नॅचिंगसाठी नाशकात सक्रिय झाली आहे. या टोळीने किंवा दंगल पाटलाच्या डमीने अवघ्या सहा दिवसांत सहा लाख रुपयांचा मुद्देमाल हातोहात लंपास केला असून, त्यानुसार पथके संशयितांच्या मागावर रवाना झाली आहे. शहरातील ‘स्टॉप अँड सर्च’ या शोधमोहिमेने आता वेग घेतला आहे.
हे देखील वाचा : Nashik News : मोडाळे ग्रामपंचायतीस स्वच्छ व हरित गाव पुरस्कार
लग्नसराईमुळे (Marriage) सोने खरेदी, बाजारपेठेतील गर्दी व लॉन्स-मंगल कार्यालयांबाहेर असलेल्या वऱ्हाडी मंडळातील महिलांच्या गळ्यातील सोनसाखळी खेचण्याचा उद्योग करणाऱ्या टोळ्यांनी शहरात प्रवेश केला आहे. पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी जबरी चोऱ्या रोखण्याचे सक्त आदेश पोलिस ठाण्यासह गुन्हे शाखांना दिले आहेत. त्यानुसार शहरात मंगल कार्यालये, लॉन्स, हॉटेलाबाहेर गस्त सुरु झाली आहे. यासह ‘स्टॉप अँड सर्च’ कारवाईत वाहने तपासून संशयितांवर पाळत ठेवण्यात येत आहे.
हे देखील वाचा : Nashik News : निफाड तालुक्यात अवकाळी पाऊस; रब्बी पिकांवर होणार परिणाम
पोलिसांनी (Police) चौकाचौकांचा ताबा घेतल्याने जबरी चोऱ्या थांबण्याची शक्यता आहे. दरम्यान, पोलिसांच्या माहितीनुसार सोनसाखळी चोरट्यांमध्ये जिल्ह्यातील सराईत गुन्हेगारांसह (Criminal) इराणी टोळीचा सहभाग आहे. कल्याण, भिवंडी, ठाणे, आंबिवली, श्रीरामपूर व उल्हासनगरातून रात्री किंवा पहाटे शहरात पोहोचून काही तासांत विविध परिसरात सोनसाखळ्या ओरबाडून या टोळीतील संशयित पसार होत आहेत. काही वर्षांपूर्वी याच स्वरुपाची गुन्हेगारी शहरात फोफावली होती. तर गत दोन-अडीच वर्षांत स्थानिक चोरट्यांचा जबरी चोऱ्यांमध्ये सहभाग वाढला. त्यानुसारही पोलिसांनी संशयितांचा माग काढण्यास सुरुवात वात केली आहे.
हे देखील वाचा : मविआला मोठा धक्का! विरोधकांनी बहिष्कार टाकलेला असतानाही अबू आझमींनी घेतली आमदारकीची शपथ
मैत्रिणींसोबत मौजमजेसाठी लूट
मंगळसूत्र ओरबाडणाऱ्या दंगल पाटील या इंजिनिअरला सन २०२१ मध्ये अटक करण्यात आली. त्याने मित्रांसह खेचलेल्या सोनसाखळ्या सराफ व्यावसायिकांना विकून पैसे घेतल्याचे निष्पन्न झाले होते. सिव्हील इंजिनिअर असलेल्या दंगल उर्फ उमेश अशोक पाटील (२९, रा. जयभवानी रोड) याने साथीदार तुषार बाळासाहेब ढिकले (३०, रा. आडगाव शिवार) याच्या मदतीने मिळून २०१८ पासून २० सोनसाखळ्या ओरबाडल्या होत्या. तर नोव्हेंबर २०२० पासून दंगल याने एकट्यानेच ३६ सोनसाखळ्या ओरबाडल्या होत्या.
हे देखील वाचा : नाशिक-पुणे रेल्वे आराखडा अंतिम टप्प्यात; खा. वाजेंनी घेतली रेल्वेमंत्र्यांची भेट
रात्री उशिरापर्यंत नाकाबंदी
वाढत्या चेनस्नॅचिंगच्या घटनांमुळे शहर पोलीस सर्व स्तरांतून टिकेचे धनी होत असल्याने पोलीस आयुक्त संदीप कर्णिक (Sandeep Karnik) यांनी शहर आयुक्तालयासह पोलीस ठाणे प्रभारींची कानउघडणी केली आहे. त्यानुसार, विविध भागांत उशिरापर्यंत स्टॉप अॅन्ड सर्च कारवाई आणि नाकाबंदी वाढविण्यात आली आहे. त्यात मात्र, संशयित हाती लागलेले नाहीत.