Friday, May 1, 2026
Homeक्राईमNashik News : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले ढिकले कुटुंबियांचे सांत्वन

Nashik News : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले ढिकले कुटुंबियांचे सांत्वन

नाशिक | Nashik

नाशिक (पूर्व) विधानसभा मतदार संघाचे आमदार ॲड राहुल ढिकले (MLA Rahul Dhikale) यांच्या पत्नी आदिती ढिकले यांचे ह्दयविकाराने (Heart Attack) आज निधन झाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी आमदार ॲड ढिकले यांच्या निवासस्थानी भेट देवून ढिकले कुटुंबियांचे सांत्वन केले.

- Advertisement -

हे देखील वाचा : Nashik News : आमदार राहुल ढिकलेंच्या पत्नीचे निधन; CM फडणवीसांनी घेतले पार्थिवाचे अंत्यदर्शन

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते आज (शनिवार) पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जन्मोत्सवाचे औचित्य साधून महाराष्ट्र शासनाच्या (Maharashtra Government) जलसंपदा विभागामार्फत आयोजित करण्यात आलेल्या ‘गोदा ते नर्मदा’ जलयात्रेचा शुभारंभ श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर (Trimbakeshwar) येथे झाला. यावेळी त्यांना आमदार राहुल ढिकले यांच्या पत्नीच्या (Wife) निधनाची माहिती मिळताच त्यांनी आपले नाशिकमधील पुढील सर्व कार्यक्रम रद्द केले.

हे देखील वाचा : Devendra Fadnavis : नदीजोड प्रकल्पच्या माध्यमातून राज्य दुष्काळमुक्त करणार-मुख्यमंत्री फडणवीस

दरम्यान, यानंतर मुख्यमंत्री त्यांनी ढिकले यांच्या नागचौकातील निवासस्थानी धाव घेत आदिती ढिकले यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले. यावेळी त्यांचे समवेत जलसंपदा मंत्री गिरीष महाजन, आमदार प्रा. देवयानी फरांदे, आमदार सीमा हिरे, आमदार सरोज अहिरे, पोलीस उपायुक्त मोनिका राऊत, पोलीस उपायुक्त किरणकुमार चव्हाण, तहसलीदार पंकज पवार, अपर तहसीलदार अमोल निकम आदी उपस्थित होते.

हे देखील वाचा : Devendra Fadnavis : छत्रपती शिवाजी महाराजांबाबत धीरेंद्र शास्त्री-संजय गायकवाडांची विधाने; CM फडणवीस स्पष्टच बोलले, म्हणाले…

ताज्या बातम्या

Rohit Pawar : उन्हात होरपळ, विजेचा खेळखंडोबा; आ. रोहित पवारांच्या नेतृत्वाखाली...

0
जामखेड । तालुका प्रतिनिधी कर्जत-जामखेड तालुक्यातील तीव्र वीजटंचाई आणि अनियमित वीजपुरवठ्याच्या प्रश्नावर आज आ. रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली कर्जत येथील महावितरण कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात...