Friday, October 2, 2026
Homeक्राईमNashik News : काळजाचा ठोका चुकवणारी कौटुंबिक दुर्दशा; लेकीच्या विरहात वडिलांची आत्महत्या

Nashik News : काळजाचा ठोका चुकवणारी कौटुंबिक दुर्दशा; लेकीच्या विरहात वडिलांची आत्महत्या

जगाचा निरोप घेतानाही जबाबदारीचे ठेवले भान

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

एका विस्कटलेल्या कुटुंबाचा शेवट इतका क्रूर असू शकतो, याचा प्रत्यय आणून देणारी धक्कादायक घटना कामटवाडे परिसरातील (Kamtwade Area) वावरेनगर येथे घडली आहे. १४ वर्षाच्या अल्पवयीन लेकीने गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केल्यानंतर, तिच्या विरहात आणि दुःखाच्या तीव्र आघातात वडिलांनीही तीनच दिवसांत त्याच पद्धतीने जीवनयात्रा संपवली, अत्यंत बिकट मानसिक स्थितीत असतानाही त्यांनी भाजीपाला, किराणा आणि किरकोळ उधारीचा इत्यंभूत हिशेब लिहून पाठवला अन् त्यानंतर गळफास घेतला.

- Advertisement -

हे देखील वाचा : Nashik News : खड्डा चुकविताना दुचाकी घसरली; व्यावसायिकाचा मृत्यू

हर्षल बाजीराव आनेराव असे आत्महत्या केलेल्या पित्याचे (Father) नाव आहे. तर त्यांची १४ वर्षांची मुलगी प्रणवी आनेराव हिने रविवारी (दि. २६) रात्री साडेआठच्या सुमारास राहत्या रो-हाउसमध्ये गळफास घेतला होता. पोलिसांच्या माहितीनुसार, हर्षल आनेराव हे कुरिअर व्यवसायातून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. सुमारे चार वर्षांपूर्वी त्यांच्या पहिल्या पत्नीसोबत कायदेशीर फारकत झाली होती. घटस्फोटानंतर मुलगी प्रणवी ही वडील हर्षल यांच्यासोबतच राहत होती. काही काळानंतर हर्षल यांनी दूसरे लग्न केले. दुसरी पत्नी, एक वर्षांचा लहान मुलगा, प्रणवी आणि हर्षल असा त्यांचा संसार सुरू होता. एकाच घरात तीन दिवसांच्या अंतराने घडलेल्या दोन आत्महत्येच्या घटनांमुळे अंबड पोलीस ठाण्याचे (Ambad Police Station) अधिकारी व कर्मचारीही सुन्न झाले आहेत.

कौटुंबिक संघर्षाची किनार अन् लेकीचे नैराश्य

अभ्यासात अत्यंत हुशार असलेली प्रणवी गेल्या काही महिन्यांपासून जुन्या कौटुंबिक घटनांमुळे आणि मानसिक तणावातून नैराश्यात होती. याच नैराश्यातून तिने रविवारी रात्री गळफास लावून घेतला. सोमवारी (दि. २७) तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. पोटच्या गोळ्याचा असा अचानक मृत्यु झाल्याने हर्षल हे मानसिक धक्क्याखाली होते. लेकीच्या (Girl) विरहाने त्यांना पुरते उध्वस्त केले होते.

हे देखील वाचा : Nashik Crime News : कोवळ्या मनावर विभक्ततेचा आघात; चौदा वर्षीय बालिकेने घेतला गळफास

अखेरच्या क्षणीही जबाबदारीचे भान.. अन् निरोप

मुलीच्या अंत्यसंस्कारानंतर अवघ्या दोनच दिवसांत, म्हणजे बुधवारी (दि. २९) पहाटे तीन वाजेच्या सुमारास हर्षल यांनी रो हाउसमध्ये गळफास घेतला, मात्र, जगाचा निरोप घेण्यापूर्वी त्यांनी आपल्या मेहुण्याच्या व्हॉट्सअॅपवर एक मेसेज पाठवला. स्वतः अत्यंत मानसिक तणावात असतानाही, कोणाचेही एक पैशाचे देणे राहू नये या भावनेने त्यांनी घरातील भाजीपाला, किराणा सामान आणि दैनंदिन व्यवहारातील किरकोळ उधारीचा संपूर्ण हिशेब त्या मेसेजमध्ये लिहून पाठवला होता. हा मेसेज पाठवल्यानंतर काही वेळातच त्यांनी आयुष्याचा दोर कापला. घटनेची माहिती मिळताच चुलत जावई विक्रांत गिते यांनी हर्षल यांना तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले, परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

ताज्या बातम्या

इन्व्हेस्ट

‘इन्व्हेस्ट महाराष्ट्र’! १० लाख कोटींच्या गुंतवणुकीसाठी सामंजस्य करार

0
मुंबई प्रतिनिधीमहाराष्ट्राला देशातील अग्रगण्य औद्योगिक राज्य आणि देशाच्या औद्योगिक विकासाचे प्रमुख केंद्र बनविण्याच्या दिशेने ‘इन्व्हेस्ट महाराष्ट्र’ हा महत्त्वपूर्ण टप्पा ठरणार आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून...