सिन्नर | Sinnar
येथील ढग्या डोंगर संवर्धन समितीच्या स्वयंसेवकांसह परिसरातील नागरिक, विविध मंडळांचे वृक्षप्रेमी यांच्या प्रयत्नातून ढग्या डोंगराला लागलेली आग (Fire) दोन तासाच्या अथक प्रयत्नानंतर विझविण्यात यश आले. तथापि तोपर्यंत शंभर एकरहून अधिक क्षेत्रातील वनसंपदा (Forestry) आगीत नष्ट झाली आहे.
हे देखील वाचा : Nashik Winter News : निफाडचा पारा सात अंशावर; द्राक्ष उत्पादकांत चिंता
बारागाव पिंप्री रोडवरील श्री क्षेत्र खंडेराव महाराज देवस्थान असलेल्या ढग्या डोंगराला (Dhagya Mountain) शुक्रवारी सायंकाळी साडेसहा वाजेच्या दरम्यान आग लागली होती. अज्ञात व्यक्तीने ही आग लावण्याचे सांगितले जात आहे. यात विविध प्रकारची झाडे, गवत नष्ट झाले आहे.
हे देखील वाचा : Nashik Assembly Elections : २२ हजार ७१९ मतदारांची ‘नोटा’ला पसंती
तसेच वनसंपदेचे मोठे नुकसान झाल्याने वृक्षप्रेमींकडून (Tree Lover) हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, वनविभागाचे कर्मचारी संजय गीते यांच्या मार्गदर्शनाखाली मळहद्द मित्र मंडळ, त्रिशूल मित्र मंडळ व परिसरातील ग्रामस्थ यांनी आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले.