पंचवटी | प्रतिनिधी | Panchvati
नाशिकमधील (Nashik) बहुचर्चित म्हाडा घोटाळ्यामुळे ( MHADA Scam) राज्यातील राजकीय वातावरण तापले असून, या प्रकरणात कठोर कारवाईचे संकेत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी दिले आहेत. या घोटाळ्याच्या तपासासाठी स्थापन करण्यात आलेल्या विशेष तपास पथकाचा (एसआयटी) अहवाल पुढील १५ दिवसांत प्राप्त होणार आहे. त्यानंतर हे प्रकरण अंमलबजावणी संचालनालयाकडे (ईडी) वर्ग करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
हे देखील वाचा : Ashok Kharat Crime : खरातच्या घरात पोतेभर पैसा; मुंबईच्या पंचतारांकित हॉटेलमधून हवाला रॅकेट!
मुंबई-आग्रा महामार्गावरील (Mumbai-Aagra Highway) आडगाव येथील रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये महसूल विभागाच्या ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिरा’पूर्वी पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष सुनील बच्छाव, शहराध्यक्ष सुनील केदार, आमदार राहुल ढिकले, विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद तसेच स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते.
हे देखील वाचा : Nashik Crime News : लोंढे पिता-पुत्रांना दणका; महासंचालक कार्यालयाकडून ‘मोक्का’ मंजूर, न्यायालयात दोषारोपपत्र दाखल
यावेळी बावनकुळे म्हणाले की, गरिबांसाठी असलेली म्हाडाची घरे बळकावली गेली असून हा अत्यंत गंभीर प्रकार आहे. या प्रकरणातील दोषींना कुठल्याही परिस्थितीत सोडले जाणार नाही. गरिबांचे शोषण करणाऱ्या बिल्डरांवर कठोर कारवाई केली जाईल.” संबंधित अधिकाऱ्यांवरही कारवाईचे आदेश देण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. या गैरप्रकारांची सुरुवात भूमिअभिलेख विभागातून झाल्याचा आरोप करत, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडेही प्रकरण पाठवण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.दरम्यान, दिंडोरी तालुक्यातील भीषण अपघातात सहा मुलांसह नऊ जणांचा मृत्यू (Death) झाल्याबद्दल त्यांनी तीव्र दु:ख व्यक्त केले. मंत्री गिरीश महाजन यांनी घटनास्थळी भेट दिली असून संबंधित विहीर कायमस्वरूपी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
हे देखील वाचा : Breaking News : दिंडोरीत विहिरीत कार कोसळून नऊ जणांचा मृत्यू; दरगोडे कुटुंबीयांवर काळाचा घाला
१० कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा करणार
स्वतःवर झालेल्या आरोपांबाबत बोलताना बावनकुळे यांनी, “माझ्या नावावर ८० एकर शेती असल्याचा खोटा प्रचार केला जात आहे. प्रत्यक्षात माझ्याकडे केवळ २८ एकर जमीन आहे,” असे स्पष्ट केले. जाणीवपूर्वक बदनामी केली जात असल्याचा आरोप करत त्यांनी संबंधितांविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल झाला असून १० कोटी रुपयांचा अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार असल्याचे सांगितले.
हे देखील वाचा : Devendra Fadnavis : दिंडोरीतील कार अपघाताच्या दुर्घटनेवर मुख्यमंत्र्यांकडून शोक व्यक्त; मृतांच्या कुटुंबियांना पाच लाखांच्या मदतीची घोषणा
खरात प्रकरणात पुरावे पुढे आणा
अशोक खरात प्रकरणाबाबत (Ashok Kharat Case) बोलताना त्यांनी ही घटना महाराष्ट्राच्या संस्कृतीला काळिमा फासणारी असल्याचे नमूद केले. एसआयटीमार्फत तपास सुरू असून ज्यांच्याकडे पुरावे असतील त्यांनी पुढे यावे, असे आवाहन त्यांनी केले. अधिकाऱ्यांचा सहभाग आढळल्यास त्यांच्यावरही कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा त्यांनी दिला.
हे देखील वाचा : Ashok Kharat Crime : भोंदू खरातचा बँकिंग ‘विळखा’; १०० संशयास्पद खाती, सात खातेदारांची सखोल चौकशी
बारामती निवडणूक बिनविरोध व्हावी
बारामती निवडणुकीसंदर्भात बोलताना बावनकुळे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार हे सर्वमान्य नेतृत्व असल्याचे सांगत ही निवडणूक बिनविरोध व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त केली. यासंदर्भात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांच्यासह अन्य नेत्यांशी चर्चा झाल्याचेही त्यांनी नमूद केले.
हे देखील वाचा : Nashik Crime News : ‘इंस्टाग्राम’वरील चॅट पाहून पतीचा चढला पारा; पत्नीला फॉर्च्यूनर कारने चिरडण्याचा प्रयत्न





