Thursday, March 13, 2025
HomeनाशिकNashik News : आदिवासी महिला आत्मनिर्भर होणार

Nashik News : आदिवासी महिला आत्मनिर्भर होणार

आदिसखी प्रकल्पाने कुशल मनुष्यबळाची निर्मिती

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

अनुसूचित जमातीतील महिलांच्या (Scheduled Tribe Women) सक्षमीकरणासाठी आदिवासी विकास विभागाकडून युनिसेफ आणि सीवायडीए या सस्थांच्या मदतीने आदिसखी (वॉशमित्र) प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. या प्रकल्पाद्वारे कुशल मनुष्यबळनिर्मिती केली जाणार आहे. प्रशिक्षणानंतर पाणी, स्वच्छता व आरोग्य सुविधा देखभाल-दुरुस्तीच्या माध्यमातून स्वव्यवसायाची संधी मिळणार असल्याने आदिवासी महिला ख-या अर्थाने आर्थिकदृष्ट्या आत्मनिर्भर होणार आहेत.

- Advertisement -

हे देखील वाचा : Nashik News : मोडाळे ग्रामपंचायतीस स्वच्छ व हरित गाव पुरस्कार

आदिवासी विकास विभागाच्या (Tribal Development Department) आश्रमशाळांमध्ये प्लंबिंग, इलेक्ट्रिकल, मेसन, पेंटिंग, सोलर, सुतारकाम, वॉटर फिल्टर दुरुस्ती, रंगकाम इत्यादी देखभाल व दुरुस्तीची कामे वारंवार करावी लागतात. ही कामे करण्यासाठी वेळोवेळी कुशल मनुष्यबळाची आवश्यकता भासते. अनेकदा मनुष्यबळ उपलब्ध होत नसल्याने संबंधित भौतिक व्यवस्था वापरण्यास मर्यादा येतात. त्या पार्श्वभूमीवर आदिसखी प्रकल्प सुरु करण्यात आला आहे. प्रशिक्षणानंतर कुशल मनुष्यबळ उपलब्ध होणार असल्याने आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांची गैरसोय टळणार आहे. तर आदिवासी महिलांना यामुळे हक्काचा रोजगार मिळणार असून, त्या स्वावलंबी बनणार आहेत.

हे देखील वाचा : Nashik News : निफाड तालुक्यात अवकाळी पाऊस; रब्बी पिकांवर होणार परिणाम

दरम्यान, आदिसखी प्रकल्पाच्या माध्यमातून १२० आदिवासी महिलांना प्रशिक्षित (Trained) करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यातील ३४ आदिबासी महिलांचे प्रशिक्षण पूर्ण झाले आहे. अपर आयुक्त (मुख्यालय) संदीप गोलाईत यांच्या हस्ते महिलांना व्यवसायासाठी आवश्यक असलेल्या साहित्याच्या किटचे वाटप करण्यात आले. यावेळी सहाय्यक प्रकल्प अधिकारी सुनील कायंदे, सुनील नेरकर, प्रकल्प व्यवस्थापक योगेश पाटील, यूएनडीपीच्या अमृता भालेराव, लिपिक विजय बडे आदी उपस्थित होते.

हे देखील वाचा : मविआला मोठा धक्का! विरोधकांनी बहिष्कार टाकलेला असतानाही अबू आझमींनी घेतली आमदारकीची शपथ

या ठिकाणी व्यवसायाची संधी

आदिसखीद्वारे आदिवासी महिलांना नवीन उद्योग-व्यवसाय सुरू करण्यास प्रोत्साहन दिले जात आहे. आश्रमशाळा, अंगणवाडी, महाविद्यालय, सरकारी रुग्णालये तसेच खासगी आस्थापनामध्ये विविध देखभाल दुरुस्ती आणि नवीन कामे महिलांना करता येणार आहेत. त्यासाठी त्यांना मुख्याध्यापक, अधीक्षक आणि इतर कर्मचायांसोबत समन्वय ठेवावा लागणार आहे.

आदिसखीच्या माध्यमातून आदिवासी महिलांना प्लंबिंग, इलेक्ट्रिकल, सुतारकाम, पेंटिंग, सोलर व वॉटर फिल्टर दुरुस्ती इत्यादींचे प्रशिक्षण देण्यात आल्याने उत्पन्नाचे साधन उपलब्ध झाले आहे. त्यातून संपूर्ण कुटुंबाला आधार मिळणार आहे. प्रशिक्षणार्थी महिलांनी स्वतः सह इतरांच्या रोजगारनिर्मितीला प्राधान्य देण्याची गरज आहे.

संदीप गोलाईत, अपर आयुक्त (मुख्यालय) आदिवासी विकास विभाग

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Dadasaheb Khindkar : धनंजय देशमुखांचा साडू पोलिसांना शरण; तरुणाला केली होती...

0
मुंबई | Mumbai मागील काही दिवसांपासून सोशल मीडियावर बीड येथील मारहाणीचे विविध व्हिडीओ व्हायरल होत आहेत. सगळ्यात आधी मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुखांना (Santosh Deshmukh) मारहाण...