Wednesday, July 8, 2026
HomeनाशिकNashik Dindori News : ​ तालुक्यात समाधानकारक पाऊस; धरण साठ्यात वाढ, बळीराजा...

Nashik Dindori News : ​ तालुक्यात समाधानकारक पाऊस; धरण साठ्यात वाढ, बळीराजा सुखावला

ओझे | विलास ढाकणे | Oze

दिंडोरी तालुक्यात (Dindori Taluka) गेल्या दोन दिवसांपासून कोसळत असलेल्या समाधानकारक पावसामुळे शेतकरी (Farmer) वर्गात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. तालुक्यातील ओढे, नाले आता खळखळून वाहू लागले असून विहिरींच्या पाणीपातळीतही वाढ होण्यास सुरुवात झाली आहे. पावसाने अशीच काही दिवस साथ दिल्यास आणि थोडी उघडीप दिल्यास शेतकरी राजा पेरणीसाठी सज्ज झाला आहे.

- Advertisement -

हे देखील वाचा : Nashik News : चोर चावडी धबधब्याच्या डोहात बुडून २१ वर्षीय तरुणाचा मृत्यू; २४ तासांनंतर सापडला मृतदेह, NDRF ने राबवली शोधमोहीम

​गेल्या दोन दिवसांपासून प्रामुख्याने रात्रीच्या वेळी शांत आणि संततधार पाऊस (Rain) पडत आहे. यामुळे पाणी जमिनीत खोलवर मुरले असून शेतकऱ्यांची पाण्याची चिंता बऱ्याच अंशी दूर झाली आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा पाऊस तब्बल दोन महिने उशिरा दाखल झाल्याने तालुक्यावर दुष्काळाचे सावट येते की काय, अशी भीती व्यक्त केली जात होती. मात्र, सध्या कोसळत असलेल्या पावसाने बळीराजाला मोठा दिलासा मिळाला आहे.

हे देखील वाचा : Girish Mahajan : पिंपरी-चिंचवडच्या मोशीत मोठी दुर्घटना; मंत्री गिरीश महाजन नाशिकहून तातडीने रवाना

​भात आवणी आणि नागली पिकांना विलंब

​पाऊस उशिरा सुरू झाल्यामुळे तालुक्यातील भातशेतीची कामे रखडली होती. भाताची रोपे तयार करण्यासाठी पुरेसे पाणी नसल्याने भात उत्पादक शेतकरी हवालदिल झाले होते. मात्र, आता पावसाने हजेरी लावल्यामुळे रोपे टाकण्याच्या कामांना वेग आला आहे. असे असले तरी, यंदा भात आवणीला (लागवडीला) काहीसा विलंब होणार असल्याचे चित्र आहे. याच धर्तीवर दिंडोरीच्या पश्चिम पट्ट्यात घेतल्या जाणाऱ्या नागली पिकाच्या लागवडीलाही उशीर होत आहे.

बियाणे खरेदीची लगबग; टोमॅटो लागवडीकडे कल

​सध्या बाजारपेठेत शेतकरी वर्गाची बियाणे खरेदीसाठी मोठी लगबग सुरू झाली आहे. यामध्ये प्रामुख्याने भात, सोयाबीन, भुईमूग, उडीद, मूग आणि मका या बियाण्यांची मोठ्या प्रमाणावर खरेदी होताना दिसत आहे. त्याचप्रमाणे, दिंडोरी तालुक्यातील खरीप हंगामातील हुकमी पीक समजल्या जाणाऱ्या टोमॅटो लागवडीकडे शेतकरी वर्गाचा यंदाही अधिक कल असल्याचे दिसून येत आहे. उशिरा का होईना, पावसाने समाधानकारक हजेरी लावल्याने शेतकरी समाधानी आहेत.

हे देखील वाचा : Girish Mahajan : आधी पोलिसांच्या गाडीचे स्टेअरिंग हाती घेतलं अन् रात्री अपघातग्रस्तांना…; मंत्री महाजनांच्या ‘संकटमोचक’ कार्यशैलीची पुन्हा प्रचिती

धरणांच्या पाणीसाठ्यात हळूहळू वाढ

​दीर्घ प्रतीक्षेनंतर पडलेल्या या पावसामुळे तालुक्यातील धरणांचा चिंताजनक असलेला जलसाठा आता सुधारू लागला आहे. ओढे-नाले ओसंडून वाहत असल्याने धरणांच्या पाणीसाठ्यात हळूहळू वाढ होत आहे. पालखेंड धरणात ४७. टक्के इतका पाणीसाठा झाल्यामुळे धरणातून कादवा नदीपात्रात 630 क्युसेक पाणी सोडण्यात आले आहे.पावसाचा अदांज पाहून टप्प्याटप्प्याने हा विसर्ग वाढविण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

दिंडोरी तालुक्यातील धरणाचा आजचा पाणीसाठा

करंजवण धरण – 23.17%
पालखेंड धरण – 47.78%
वाघाड धरण – 14.12%
पुणेगाव धरण – 30.24%
ओझरखेंड धरण- 31.33%
तीसगाव धरण – 5.18%

बुधवारचा पाऊस

तालुका दिंडोरी
दिंडोरी 51.00 मि.मी
लखमापुर 67.00 मि.मी
कसबे वणी 93.00 मि.मी
मोहाडी 61. 00 मि.मी
रामशेज 40.00 मि.मी
उमराळे 73.00 मि.मी
वरखेडा 76.00 मि.मी
कोशिंबे 114.00 मि.मी
ननाशी 156.00 मि.मी

ताज्या बातम्या

घाटमाथा परिसरात अतिवृष्टीचा इशारा; त्र्यंबकेश्वरसह सहा तालुक्यातील शाळांना गुरुवारी पावसामुळे सुटी

0
नाशिक | दि. ८ जुलै २०२६ | जिमाका वृत्तसेवा भारतीय हवामान विभागाने जिल्ह्यातील घाटमाथा परिसरात अतिवृष्टीचा इशारा दिलेला आहे. तसेच गुजरातच्या दक्षिण भागात अतिवृष्टी सुरू...