Monday, April 27, 2026
Home Blog Page 13297

संत जगनाडे महाराज यांच्या जयंती निमित्त मंत्रालयात आदरांजली

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

मुंबई:

संत जगनाडे महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस सामान्य प्रशासन विभागाच्या सचिव अंशु सिन्हा यांनी आज येथे पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली.

मंत्रालयात पार पडलेल्या या कार्यक्रमात उपसचिव ज. जी. वळवी तसेच मंत्रालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी यावेळी संत जगनाडे महाराज यांना पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली.

आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार निषेध दिवस : गेल्या एक वर्षात राज्यातील ५५ टक्के लोकांनी दिली लाच

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

नाशिक : इंडिया भ्रष्टाचार सर्वेक्षण (इंडिया करप्शन सर्वे -२०१९)) ने देशातील भ्रष्टाचाराचा अहवाल जारी केला आहे. यामध्ये राज्यातील ५५टक्केपेक्षा अधिक लोकांनी मागील एका वर्षात लाच दिल्याचे आढळून आले आहे.

भारतीय भ्रष्टाचार सर्वेक्षण २०१९ च्या या अहवालात देशभरातून ८० हजारापेक्षा अधिक लोकांवर हा सर्व्हे करण्यात आला. यामध्ये १ लाख ९० हजारहून अधिक प्रतिसाद मिळाले आहेत. त्यापैकी राज्यतील ५ टक्के लोकांनी सांगितले कि, गेल्या १२ महिन्यांत त्यांना एकदाच लाच द्यावी लागली. यामध्ये जास्तीत जास्त पोलिस आणि महानगरपालिका विभागांचा समावेश आहे. या सर्वेक्षणात भ्रष्टाचाराच्या पहिल्या आठ राज्यांचादेखील समावेश करण्यात आला आहे.

दरम्यान सर्वेक्षणाचे हे तिसरे वर्ष असून ‘इंडिया करप्शन सर्व्हे २०१९’ या सर्वसमावेशक अहवालात ही संकलित करण्यात आली आहे. हे सर्वेक्षण राज्य स्तरावरही करण्यात आले यामध्ये महाराष्ट्रातून ६ हजार ७०० हून अधिक मते मिळाली. सर्वेक्षणात भाग घेतलेल्या महाराष्ट्रातील ५५ टक्के नागरिकांनी आपले काम पूर्ण करण्यासाठी लाच दिल्याचे सांगितले तर त्यापैकी २९ टक्के लोकांनी अनेकदा लाच दिली (प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या) तर २६ टक्के लोकांनी एकदा किंवा दोनदा (प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या) लाच दिली. १८ टक्के लोक म्हणाले की त्यांनी लाच न देता काम केले. गेल्या वर्षभरात ही भ्रष्टाचाराच्या घटनांमध्ये वाढ असल्याचे दिसून आले आहे.

यामध्ये २८ टक्के लोकांनी मनपा विभागात लाच दिली आहे. तसेच २३ टक्के लोकांनी पोलिसांना लाच दिली तर २२ टक्के लोकांनी इतरांना लाच दिली. यामध्ये विद्युत मंडळ, परिवहन कार्यालय, कर कार्यालय इत्यादी विभाग येतात. गेल्या वर्षाच्या तुलनेत पोलिस भ्रष्टाचाराच्या घटनांमध्ये किंचित वाढ झाली आहे, तर महानगरपालिका व मालमत्ता भ्रष्टाचारात वाढ झाली आहे.

नंदुरबार : मयत महिलेला जिवंत असल्याचे भासवून दिला बनावट अंगठा; पोलीसात गुन्हा दाखल

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

नंदुरबार| प्रतिनिधी

शहादा येथील दिवाणी न्यायालयात आर्थिक फायद्यासाठी मयत असलेल्या महिला जिवंत असल्याचे भासवून बनावट अंगठा दिल्याप्रकरणी चौघांविरूध्द तळोदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दिवाणी न्यायालय व स्तर शहादा येथे फत्तेसिंग पाडवी, जहांगीबाई पाडवी, बारकीबाई पाडवी यांनी संगनमत करून सुमनबाई गुलाबसिंग पाडवी या मयत असल्याचे त्यांना माहित असून देखील न्यायालयाची व शासनाची फसवणूक करण्याचा व गैरप्रकाराने आर्थिक फायदा मिळविण्याच्या इरादा खोटा व बनावट निशाणी अंगठा केला व मयत व्यक्तीस जिवंत असल्याचे भासवून फसवणुकीचे कृत्य केले.

न्यायालयाच्या निर्देशावरून उपविभागीय कार्यालयाचे कारकून राजु महारू गवळी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तळोदा पोलीस ठाण्यात फत्तेसिंग दित्या पाडवी, अनिल दित्या पाडवी, जहांगीबाई हाकल्या पाडवी, बारकीबाई दित्या पाडवी सर्व रा.सेंधवान ता.अक्कलकुवा यांच्याविरूध्द भादंवि कलम ४२०, ४१९, ४१७, ४६५, ४६८, ४७१,१९३, १९९, २००, २०५, ५११, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून याप्रकरणी पुढील तपास प्रशांत राठोड करीत आहेत.

विद्यार्थ्यांनी देशाच्या उभारणीत योगदान देण्याचे उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांचे आवाहन

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

सिम्बायोसिस विद्यापीठाचा सोळावा पदवीदान समारंभ संपन्न

पुणे:

भारत अनेक शतकांपासून जागतिक ज्ञान केंद्र आहे. आपल्या देशाला तक्षशिला ते नालंदा असा मोठा शैक्षणिक परंपरेचा वारसा लाभला आहे. हा वारसा जोपासत विद्यार्थ्यांनी आपल्या बौद्धिक संपदेचा वापर देशाच्या उभारणीसाठी करण्याचे आवाहन उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी आज केले.

लवळे येथे सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय अभिमत विद्यापीठाच्या सोळावा पदवीदान समारंभ नायडू यांच्या उपस्थितीत पार पडला, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी, मंत्री छगन भुजबळ, विद्यापीठाचे कुलपती शां. ब. मुजूमदार, कुलगुरू रजनी गुप्ते, प्र. कुलगुरू तथा प्रधान संचालिका विद्या येरवडेकर, कुलसचिव एम. जी. शेजूल उपस्थित होते.

उपराष्ट्रपती नायडू म्हणाले, शिक्षण घेण्यासाठी जात,‍ लिंग, भाषा, देश यांची कोणतीही बंधने नसतात. शिक्षणामुळे जगभरातील संधीची दारे उघडली जातात. शिक्षण हे प्रत्येकाला जबाबदारीची जाणीव करुन देते. आपल्या देशाला तक्षशिला ते नालंदा असा उज्ज्वल शैक्षणिक वारसा आहे. संपूर्ण आशिया खंडातील विद्यार्थी शिक्षणासाठी भारतात येत होते. हा “वसुधैव कुटुंबकम्”चा वारसा सिम्बायोसिस विद्यापीठ चालवत आहे. जगभरातील विविध देशांचे विद्यार्थी या ठिकाणी शिक्षणासाठी येतात, ही गौरवाची बाब आहे.

पुणे शहर हे महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी आहे. तसेच न्यायमूर्ती रानडे, गोपाळ कृष्ण गोखले, गोपाळ गणेश आगरकर, लोकमान्य टिळक, वासुदेव बळवंत फडके या लोकोत्तर पुरुषांचा वारसा या शहराला लाभला आहे. या शहराशी महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचेही ऋणानुबंध असल्याचे नायडू यांनी सांगितले.

यावेळी विद्यापीठातील गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांना उपराष्ट्रपतींच्या हस्ते पदवी प्रदान करण्यात आली. उपराष्ट्रपतींच्या हस्ते प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर, शास्त्रज्ञ डॉ. टेसी थॉमस यांना मानद डॉक्टरेट पदवी सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आली.

यावेळी जावेद अख्तर, डॉ. टेसी थॉमस यांची भाषणे झाली. प्रास्ताविक डॉ. शां. ब. मुजूमदार यांनी केले तर आभार विद्यापीठाच्या प्र. कुलगुरू तथा प्रधान संचालिका विद्या येरवडेकर यांनी मानले. कार्यक्रमानंतर उपराष्ट्रपती नायडू यांच्या हस्ते विद्यापीठाच्या आवारात वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर, पालक, शिक्षक उपस्थित होते.

धुळे : राष्ट्रीय बाल विज्ञान परिषदेत पाच प्रकल्पाची राज्यस्तरावर निवड

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

धुळे प्रतिनिधी – 

येथील घासकडबी शैक्षणिक संस्थेतर्फे घेण्यात आलेल्या राष्ट्रीय बाल विज्ञानपरिषदेत जिल्ह्यातील पाच प्रकल्पांची राज्यस्तरावर निवड झाली आहे. जिल्ह्यातून १९१ प्रकल्प जिल्हास्तरावर सादर करण्यात आले.

त्यातील १२ प्रकल्प विभागा स्तरावर निवडण्यात आले आहेत. १२ पैकी ५ प्रकल्पांची राज्यस्तरावर निवड झाली आहे. त्यात योगेश धनगर, तेजस पवार, प्रथमेश माळी, वरद जोशी, श्‍वेता नागापूरे, रोशनी महाले, पुष्कर देवरे, प्रित तवर, ईश्‍वर वळवी, अनिल नरिला यांच्या उपकरणांचा समावेश आहे.

Deshdoot Samvad Katta: Collective efforts of society needed for avoiding food wastage

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

NASHIK:

The scenario of food wastage in parties, weddings, birthday and any celebration is very well known to us. The habit of eating out is also increasing in the city and food wastage is growing parallel to that. The egos of making events bigger, the big new trends of big fat weddings, showing off through multiple food items are leading to a lot of food wastage.

Deshdoot in its new initiative of developing ‘Civic Sense’ in Nashikites dedicated its special segment of Deshdoot Katta, on Saturday to Avoiding Food Wastage issue. The discussion was joined by Varsha Ugale-Gamne of Curry Leaves, Arun Natu of Natu Caterers, Praveen Pawar, manager Pancham and Mayur Bhandari, a social activist.
Food wastage has became a habit among people.

A person whenever goes to any party or any wedding takes access food because of various reasons. The new buffet system of serving is one of the reasons for that. Many people are shy or lazy to stand in a queue; so they take excess food in plate. Sometimes out of fear that food may get over people take excessive amount of food and when they can’t finish it, they simply throw it, said the panel out of their experiences.

At parties of events people do not think even once before throwing food as they have not paid for it. Whereas in hotels there is lesser food wastage as people pay cost for it, observed the experts.

The panel suggested that youngsters should be taught the right values of food. They should be shown the reality of the world that many children sleep empty stomach. The food items should be kept minimum in ceremonies and events to avoid food wastage. it was suggested.

नशिराबाद (ता.जळगाव) येथे गीता जयंती उत्सव

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

नशिराबाद, ता.जळगाव –

येथील परमार्थ सेवा केंद्र व न्यू इंग्लिश स्कूल प्राथमिक व माध्यमिक विद्यामंदिरा द्वारे गीता जयंती उत्साहात साजरी. सर्वप्रथम जगाची माऊली ज्ञानेश्वर यांच्या प्रतिमेचे व परमपूज्य अशा श्रीमद्भभागवत गीतेचे पूजन व वैकुंठवासी हभप सुरेश महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन हभप प्रभाकर महाराज यांच्या हस्ते करण्यात आले.

या दिंडी सोहळ्याची सुरुवात श्री विठ्ठल मंदिरापासून तर सांगता परमार्थ सेवा केंद्रा जवळ करण्यात आली.

या दिंडी सोहळ्यात माध्यमिक विभागाचे उपशिक्षक आर.एल.पांचपांडे यांच्या मार्गदर्शनातून लेझीम पथक तर प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक प्रविण महाजन यांच्या मार्गदर्शनातून विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी वारकरी संप्रदायाची वेशभूषा धारण केलेली होती.

या दिंडी सोहळ्यात विद्यार्थ्यांनी ‘गीता से क्या नाता है गीता हमारी माता है’ अशा पद्धतीने गीतेचा जयजयकार केला. तसेच गावातील भजनी मंडळाने देखील टाळ व मृदुंगाच्या साह्याने संपूर्ण नशिराबाद शहर भजना द्वारे आनंदमय केला.

या दिंडी सोहळ्यात गावातील प्रतिष्ठित नागरिक गणपत सोमा पाटील, जनार्दन काका माळी, किशोर पाटील, विजय सरोदे, सुनील पाटील, मोहन येवले, धीरज पाटील, डिगंबर रोटे, कमलेश नेहते, चंदू भोळे, पितांबर वाघुळदे, गावातील भजनी मंडळ व प्राथमिक विभागाचे सर्व शिक्षक उपस्थित होते.

पालखी सोहळ्याची समाप्ती परमार्थ सेवा केंद्रा जवळ होऊन  पालखी  सोहळ्यातील विद्यार्थ्यांना खाऊ राजगिरा लाडू, केळी चॉकलेट देण्यात आल्या. त्यानंतर गीतापारायण करण्यात येऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन ह.भ.प. प्रभाकर महाराज यांच्या मार्गदर्शनातून करण्यात येऊन त्यांना  धीरज पाटील, मोहन येवले, कमलेश नेहते व ग्रामस्थांचे सहकार्य लाभले.

Mercury lowers, giving call for winter; Temperature drops by 4 degree Celsius in 24 hours

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

NASHIK:

Nashikites were irritated by the high temperature even as the winter season had begun. The maximum temperature had reached 30.2 degree Celsius on an average in a day. Finally, on Saturday, the Nashikites got little comfort after the minimum temperature reached to 14.2 degree Celsius, which was between 18 to 20 degree Celsius last ten days straight.

Nashikites who were eagerly awaiting for the typical Nashik winter, got some sense of cold on Saturday. The winter wears which were still in the lockers came out on Saturday early morning.  The college students who like to flaunt their winter collections wore their newly purchased, jackets, sweaters, hoodies, and coats on their way to college. Those who forgot to wear a sweater or jacket were seen shimmiring in cold.

Even as the calander rushed into December citizens had not witnessed the chills of winter for which the city is known. The Indian Meteorology Department has predicted rise in temperature in the next five days, again by one or two degree Celsius. The weather will be dry and humidity will be around 40 to 60 per cent in air. The wind speed is expected to stay between 8 to 10 km per hour.

नेट परीक्षेसाठी नाशिक केंद्र असूनही परीक्षार्थींची फरफड

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

कोहोर : गेल्या तीन वर्षांपासून नेट परिक्षासेसाठीचे नाशिक केंद्र म्ह्णून असले तरी यंदा परीक्षार्थी संख्या वाढल्याने जिल्ह्यातील अनेक उमेदवारांना शेजारील जिल्ह्यात परीक्षा द्यावा लागली.

.दरम्यान युजीसीकडून घेतली जाणारी राष्ट्रीय पात्रता परिक्षा(नेट) परीक्षा यंदा २ डिसेंबर ते ६ डिसेंबर पर्यंत घेण्यात आली. पुर्वी ही परिक्षा देण्यासाठी राज्यातील काही मर्यादित जिल्हे केंद्र म्हणून अस्तित्वात होते. त्यामुळे परिक्षार्थीना पुणे, औरंगाबाद, मुंबई, नागपूर या जिल्ह्यांच्या केंद्रावर जावून परिक्षा द्यावी लागत असे. परिक्षेसाठी दुसऱ्या जिल्ह्याच्या ठिकाणी जावून वेळ,पैसा,आदी खर्च व इतर समस्यांना उमेदवारांना नेहमी तोंड द्यावे लागत होते.

त्यासाठी मागील तीन वर्षापासून केंद्रातील युजीसीने यात बदल करत नेट परिक्षा देण्यासाठी राज्यातील काही जिल्ह्यांचा नव्याने समावेश केला. त्यामध्ये या परिक्षेसाठी नाशिक जिल्ह्याचाही समावेश नव्याने करण्यात आल्याने, नाशिक जिल्ह्यातील नेट परिक्षा देणाऱ्या उमेदवारांमध्ये आंनद झाला होता.

पण हा आंनद एक वर्षापुरताच मर्यादित राहीला, आणि पुन्हा परिक्षार्थी उमेदवारांच्या माथी कपाळमोक्षचा शिक्का बसला. नेट परिक्षा देण्यासाठी नाशिक जिल्ह्यातच केंद्र मिळावा, म्हणून उमेदवारांने पंसती क्रमांक पहिला देवूनही स्वतःचा जिल्हा न मिळता नजिकचा जिल्हा दिला गेला. यामुळे परिक्षार्थी उमेदवारांमध्ये मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त होत आहे.

परिक्षा केंद्र नाशिक दिलेला असतांनाही, युजीसीने पंसती क्रमांक दोन व तीन आदी पर्यायी जिल्ह्यांची परिक्षा केंद्र दिले गेली. त्यामुळे परिक्षार्थी उमेदवारांना दुसऱ्या जिल्ह्यातील परिक्षा केंद्र शोधणे कठीण बनले होते. तसेच आर्थिक भूर्दंडही मोठ्या प्रमाणात सोसावा लागला.

At least 43 killed as fire breaks out in Anaj Mandi in Delhi, PM calls the blaze ‘horrific’

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

NEW DELHI:

A massive fire in a building in Anaj Mandi caused probably due to short circuit claimed at least 43 lives here on Sunday. Fire Services chief Atul Garg said the blaze was put out by 25 fire trucks and the rescue operation has been completed. He said that over 50 people had been moved out of the area.

Initially the casualty figures stood at around 30 but at later stage, it was feared that the mishap has claimed at least 43 lives. Prime Minister Narendra Modi described the fire as “extremely horrific” and wished the injured a “quick recovery”.

“My thoughts are with those who lost their loved ones. Wishing the injured a quick recovery. Authorities are providing all possible assistance at the site of the tragedy,” he tweeted. Union Urban Development Minister Hardeep Singh Puri and Delhi Chief Minister Arvind Kejriwal also visited the spot. “The exact cause of the mishap is not yet ascertained,” the Chief Minister told reporters.

According to fire department sources, the information about the fire incident was received around 0520 hrs and immediately after that more than 25 vehicles of fire brigade were sent to the spot. The evacuated people were sent to nearby Lok Nayak Jai Prakash Hospital (LNJP) and Hindu Rao Hospital for treatment, the fire department said.

A team of National Disaster Response Force (NDRF) has reached the incident spot. According to the police, more than 30 people have died due to suffocation and a large number of people are being treated in both hospitals. According to Medical Superintendent of LNJP, Dr Kishore Kumar, 14 people brought to the hospital have died and a large number of injured are being treated.

One attending medico said the victims were brought to the hospital by rescuers. Some of the victims being treated for burns or smoke inhalation were in stable condition, he said. The cause of the fire is being investigated. “The reason of the fire is yet to be known,” an official said. Old-timers say in 1997, a fire in a movie theater in New Delhi had killed 59 people.

In February this year, at least 17 people were killed by a fire in a six-story hotel. Union Home Minister Amit Shah expressed condolences for the mishap. “Tragic loss of precious lives in the fire accident in New Delhi. My deepest condolences with families of those who have lost their loved ones. I pray for the early recovery of the injured. Have instructed concerned authorities to provide all possible assistance on urgent basis,” Mr Shah tweeted.

According to an R Rahman, an elderly whose two nephews were working in the factory, “At least 12-15 machines were installed in the unit. I have no idea about the factory owner. I was told they make bags”. “My nephews Mohd mran and Ikramuddin were inside the factory. I don’t know where they are,” he said. According to him, many units were operating from the premises which was located in a congested area.