नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
अमेरिका-इस्रायल इराण देशांदरम्यान सुरु असलेल्या युद्धामुळे जगभरात इंधन टंचाई निर्माण झाली आहे. याची झळ भारताला ही बसत असली तरी देशभरात पेट्रोल, डिझेल आणि LPG च्या टंचाईबाबत सुरू असलेल्या चर्चांदरम्यान केंद्र सरकारने महत्त्वपूर्ण स्पष्टीकरण दिले आहे. पेट्रोलियम मंत्रायलाने स्पष्टपणे सांगितले की देशातील इंधन पुरवठा पूर्णपणे सुरक्षित असून परिस्थिती नियंत्रणात आहे. नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केंद्र सरकारने केले आहे. तसेच देशातील सर्व पेट्रोल पंप आणि LPG वितरण केंद्रांवर पुरेसा साठा उपलब्ध असल्याची माहितीही सरकारने दिली.
अधिकृत माहितीवर विश्वास ठेवावा
सरकारने नागरिकांना इशारा दिला आहे की, काही ठिकाणी जाणीवपूर्वक चुकीची माहिती पसरवून भीती निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. अशा अफवांपासून दूर राहावे आणि केवळ अधिकृत माहितीवर विश्वास ठेवावा, असे मंत्रालयाने म्हटले आहे.
Ashok Kharat Case: सावधान! तुमच्याही मोबाईलमध्ये खरातचे ‘ते’ व्हिडीओ आहे का? लगेच डिलीट करा, नाहीतर…
पुरवठा साखळी मजबूत
पेट्रोलियम मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात कुठेही पेट्रोल, डिझेल किंवा LPG ची कमतरता नाही. सर्व रिटेल फ्युएल आउटलेट्सकडे पुरेसा साठा उपलब्ध असून वितरण सुरळीत सुरू आहे. पुरवठा साखळी मजबूत असून कोणत्याही प्रकारचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता सध्या नाही.
अनावश्यक साठेबाजी करु नये
नागरिकांनी अनावश्यक साठेबाजी करू नये. पेट्रोल, डिझेल आणि LPG चा पुरवठा सुरळीत सुरू असल्यामुळे कोणत्याही प्रकारची घाई किंवा घबराट करण्याचे कारण नाही. जागतिक पातळीवर सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर इंधन पुरवठ्याबाबत चिंता व्यक्त होत असली, तरी भारताने परिस्थितीवर नियंत्रण ठेवले असल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे.
राज्यांसाठी ३७ लाख ४४ हजार लिटर रॉकेलच्या वाटपाला मंजुरी
एकीकडे गॅस एजन्सीमध्ये गॅस पुरवठ्याबाबत काही नियमावली तयार करण्यात आली आली आहे. त्यातच, आता युद्धाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. केंद्र सरकारकडून राज्यांसाठी ३७ लाख ४४ हजार लिटर रॉकेलच्या वाटपाला मंजुरी देण्यात आली आहे. त्या माध्यमातून राज्यातील शिधापत्रिका धारकांना ३ लिटर रॉकेल मिळणार आहे.




