Wednesday, April 15, 2026
Homeब्रेकिंग न्यूजSahar Shaikh: कैसा हराया…सहर शेख यांचे नगरसेवक पद धोक्यात; शासकिय यंत्रणांची दिशाभूल...

Sahar Shaikh: कैसा हराया…सहर शेख यांचे नगरसेवक पद धोक्यात; शासकिय यंत्रणांची दिशाभूल केल्याचा आरोप

ठाणे | Thane
राज्यात महानगरपालिकेच्या निवडणुका जानेवारीत पार पडल्या. यावेळी ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत मुंब्रा परिसरातील प्रभाग क्रमांक ३० सर्वाधिक चर्चेत राहिला. या प्रभागातून एमआयएमच्या उमेदवार सहर शेख यांनी विजय मिळवला. त्यांचा विजयी रॅली दरम्यान कैसा हराया… हा डायलॉग यावेळी मोठ्या प्रमाणावर चर्चेत आला होता. आता याच सहर शेखकडून शासकीय यंत्रणांची दिशाभूल झाल्याचं समोर आले आहे.

सहर शेख यांनी शासकिय यंत्रणांची दिशाभूल केल्याचे प्रकरण समोर आले असून महाराष्ट्रातील बनावट जातीचा दाखला मिळविल्याची तक्रार करण्यात आली आहे. सहर शेख यांनी चार महत्त्वाच्या शासकीय यंत्रणांची दिशाभूल केली असून, आता तिच्या नगरसेवक पदावर गंडांतर येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

- Advertisement -

नेमकं प्रकरण काय आहे?
ठाणे महानगर पालिकेच्या प्रभाग क्र. ३० च्या एआयएमआयएम पक्षाच्या नगरसेविका सहर शेखकडून बोगस जात प्रमाणपत्र दाखला सादर करून निवडणूक लढवल्याची तक्रार प्राप्त झाली आहे. सहर शेख यांनी बनावट कागदपत्राचे आधारे शासनाची फसवणूक केल्याची तक्रार करून सदर प्रकरणाची सखोल चौकशी करून फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याची तक्रारदाराची मागणी आहे. सहर शेखकडून यंत्रणांची दिशाभूल केल्याचा तक्रारदाराचा आरोप आहे.

Aaditya Thackeray : आदित्य ठाकरेंकडे शिवसेनेच्या कार्याध्यक्षपदाची धुरा? १९ जूनला मोठी घोषणा होण्याची शक्यता

उत्तर प्रदेशातील गाझियाबादचे मूळ रहिवासी युनूस इकबाल शेख महाराष्ट्रात स्थलांतरित झाले. युनूस शेख यांनी स्थलांतरितांना नमुना-१० लागू असताना नमुना-८ वापरून अधिकाऱ्यांची दिशाभूल करत बनावट दाखला मिळविला. त्याआधारे सहरने मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयातून घेतलेल्या जात प्रमाणपत्राची पडताळणी करून ठाणे महानगरपालिकेची निवडणुक लढवून विजयी झाल्या.

IPL 2026 : KKR चा पाय खोलात! सलग चौथ्या पराभवानंतर कर्णधार अजिंक्य रहाणेला बीसीसीआयचा मोठा दणका

नमुना ८ वापरून बनावट दाखला मिळवला
ठाणे उपविभागीय अधिकारी कार्यालयात सिद्दिकी अहमद यांनी सहर शेख यांच्या जात दाखल्याची पडताळणी करण्याची तक्रार दाखल केली होती. युनूस यांनी स्थलांतरितांना नमुना 10 लागू असताना नमुना 8 वापरून अधिकाऱ्यांची दिशाभूल करत बनावट दाखला मिळवला. त्या आधारे सहरने मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयातून घेतलेल्या जात प्रमाणपत्राची पडताळणी करून चौकशीची मागणी सिद्धीकी अहमद यांनी केली आहे. ठाणे तहसीलदारांना प्राप्त तक्रारीनुसार 18 मार्च रोजी घेतलेल्या सुनावणीस आजाराचे कारण देत युनूस गैरहजर होते सुनावणीस उपस्थित असलेल्या त्यांच्या वकिलांनी जात दाखल्याची कलर प्रिंट व काही कागदपत्र सादर केले. 23 मार्चला पुन्हा सुनावणी घेण्यात आली तेव्हा ठाणे तहसीलदारांनी शेख यांच्या जात प्रमाणपत्र दाखल्यामधील त्रुटी काढल्या. तर ठाण्याच्या रहिवासी असलेल्या सहर शेख ने मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयातून जातीचा दाखला घेण्याच्या हेतूवर शंका उपस्थित केली जात आहे. यासंदर्भात सहर शेख आणि तिच्या वडिलांना एबीपी माझा ने संपर्क केला असता अध्याप संपर्क होऊ शकला नाही.

ताज्या बातम्या

भोंदू खरातच्या संपर्कात कोण-कोण? अंजली दमानियांनी अनेक मंत्री, त्यांचे पीए, आमदारांचे...

0
मुंबई । Mumbai नाशिकचा वादग्रस्त भोंदूबाबा अशोक खरात याच्याभोवती सुरू असलेल्या तपासात आता राजकीय वर्तुळाला हादरवून सोडणारी माहिती समोर आली आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया...