Saturday, July 27, 2024
Homeब्रेकिंग न्यूजAssembly Election Result 2024 : अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मोठे यश; तीन उमेदवार...

Assembly Election Result 2024 : अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मोठे यश; तीन उमेदवार आले निवडून

मुंबई | Mumbai

लोकसभा निवडणुकीचे (Loksabha Election) मतदान (Poling) संपल्यानंतर काल विविध संस्थाकडून निकालापूर्वीचा एक्झिट पोल जाहीर करण्यात आला. या एक्झिट पोलच्या अंदाजानुसार देशात पुन्हा एकदा एनडीएचे (NDA) सरकार येण्याची शक्यता आहे. तर राज्यात महायुतीला (Mahayuti) २४ ते २६ जागा मिळू शकतात, असा अंदाज या एक्झिट पोलमध्ये दाखविण्यात आला आहे. मात्र, महायुतीमधील घटक पक्ष असणाऱ्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीला एकही जागा एक्झिट पोलमध्ये मिळताना दिसत नाही. त्यामुळे निवडणूक निकालानंतरच खरे काय ते चित्र स्पष्ट होईल. पंरतु, लोकसभेसोबतच झालेल्या अरुणाचल प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मोठे यश मिळाले असून त्यांचे काही उमेदवार निवडून आले आहेत.

- Advertisement -

हे देखील वाचा : Assembly Election Result 2024 : अरुणाचलमध्ये पुन्हा भाजपची सत्ता

अरुणाचल प्रदेशच्या (Arunachal Pradesh) विधानसभा निवडणुकीसाठी (Assembly Elections) १९ एप्रिलला मतदान झाले होते. त्यानंतर आज मतमोजणीनंतर निकाल जाहीर झाला आहे. या निकालानुसार अरुणाचल विधानसभेच्या ६० जागांपैकी तब्बल ४१ जागांवर विजय मिळवत भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे तीन उमेदवार निवडून आले आहेत. अजित पवारांच्या राष्ट्रवादीने अरुणाचल प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीत एकूण १५ जागा लढविल्या होत्या. यापैकी तीन जागी त्यांचे उमेदवार निवडून आले आहेत. तर एक उमेदवार दोन आणि दुसरा उमेदवार २०० मतांनी पडला आहे. तसेच आणखी एक उमेदवार थोड्या मतांनी पराभूत झाला आहे.

हे देखील वाचा : Exit Polls 2024 : देशात मोदी मॅजिक कायम; इंडिया आघाडी अडखळली

दरम्यान, अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नामसांग विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार नगोंगलीन बोई हे ५६ तर खोणसा पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार यांग सेन माटे ८०४ मतांनी पराभूत झाले आहेत. तसेच पक्के केसांग विधानसभा मतदार संघाचे उमेदवार टेकी हेमू ८१३ मतांनी पराभूत झाले आहेत. त्यामुळे अजित पवारांच्या राष्ट्रवादीला काही मतदारसंघांत दिलासा तर काहींमध्ये धक्का बसला आहे.

हे देखील वाचा : “मोदी पुन्हा सत्तेत आल्यावर उद्धव ठाकरे १५ दिवसांत…”; ‘या’ नेत्याचा खळबळजनक दावा

- Advertisment -

ताज्या बातम्या