Sunday, September 6, 2026
Homeमुख्य बातम्याAbhijeet Dipke : आमरण उपोषणास बसलेल्या अभिजीत दीपकेंवर महिलेकडून शाईफेक; अर्वाच्य भाषेत...

Abhijeet Dipke : आमरण उपोषणास बसलेल्या अभिजीत दीपकेंवर महिलेकडून शाईफेक; अर्वाच्य भाषेत शिवीगाळही केली

नवी दिल्ली | New Delhi

- Advertisement -

दिल्लीतील जंतरमंतर या मैदानावर नीट परीक्षेतील (Neet Exam) कथित फेरफार आणि अनियमिततेच्या निषेधार्थ गेल्या २० दिवसांपासून प्रसिद्ध पर्यावरणशास्त्रज्ञ सोनम वांगचुक (Sonam Wangchuk) हे बेमुदत उपोषणाला बसले होते. मात्र, आज (शनिवारी) सकाळी सात वाजेच्या सुमारास या उपोषणात मोठ्या घडामोडी घडल्या. दिल्ली पोलिसांनी (Delhi Police) उपोषणस्थळी दाखल होत वांगचुक यांना बळजबरीने हटवून रुग्णालयात दाखल केले. या कारवाईमुळे जंतरमंतरवर प्रचंड गोंधळ उडाला.

हे देखील वाचा : दिल्लीत हायव्होल्टेज ड्रामा! सोनम वांगचुक यांना पोलिसांनी आंदोलनस्थळावरून बळजबरीने उचललं; अभिजीत दीपकेंची आमरण उपोषणाची घोषणा

यानंतर ‘कॉकरोच जनता पार्टी’चे (CJP) संस्थापक अभिजीत दीपके (Abhijeet Dipke) यांनी आमरण उपोषणाची घोषणा केली. उपोषणास बसलेले असतानाच अभिजीत दीपके यांच्यावर एका अज्ञात महिलेने शाई फेकत अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केल्याने उपोषणस्थळी प्रचंड तणाव निर्माण झाला आहे. सोनम वांगचुक यांची प्रकृती बिघडायला आणि पोलिसांच्या कारवाईला आंदोलनकर्तेच जबाबदार असल्याचा दावा या महिलेने केला आहे.

दरम्यान, या अचानक झालेल्या हल्ल्यानंतर उपस्थित जमावाने संबंधित महिलेला (Woman) पकडले. त्यानंतर घटनास्थळी तैनात सुरक्षा रक्षक आणि पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करत महिलेला ताब्यात घेतले. या हल्ल्यानंतर संतप्त झालेल्या अभिजीत दीपके यांनी, या आंदोलनात ५००-५०० रुपये देऊन गुंड घुसवले जात आहेत, असा गंभीर आरोप केला आहे.

पांढऱ्या चादरीत गुंडाळून वांगचुक यांना नेले रुग्णालयात

गेल्या २० दिवसांपासून जंतर-मंतर येथे उपोषणाला बसलेले सोनम वांगचुक यांची प्रकृती बिघडल्याचे सांगत पोलिसांनी शनिवारी सकाळी त्यांना सफदरजंग रुग्णालयात दाखल केले. यावेळी साध्या वेशात आलेल्या पोलिसांनी वांगचुक यांना पांढऱ्या चादरीत गुंडाळून रुग्णवाहिकेतून नेल्याचा आरोप आंदोलकांनी केला. दिल्ली उच्च न्यायालयाने केंद्र आणि दिल्ली सरकारला वांगचुक यांची दररोज वैद्यकीय तपासणी करून गरज भासल्यास उपचार करण्याचे आदेश दिले होते, त्या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आली. मात्र, पोलिसांनी कारवाई करताना आंदोलकांचा तीव्र विरोध डावलल्याने तिथे मोठा गोंधळ उडाला.

हे देखील वाचा : Sharad Pawar : सोनम वांगचुक यांना पोलिसांनी आंदोलनस्थळावरून हटविले; शरद पवार म्हणाले, “सरकारची भूमिका…

वैद्यकीय अहवाल लपवला; वांगचुक यांच्या पत्नीचा गंभीर आरोप

सोनम वांगचुक यांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांच्या पत्नी गीतांजली आंगमो यांनी पोलिसांच्या भूमिकेवर तीव्र आक्षेप घेतला आहे. माध्यमांशी बोलताना त्या म्हणाल्या, “काल संध्याकाळपर्यंत सोनम यांचे सर्व वैद्यकीय अहवाल सामान्य होते. मात्र, आज अचानक त्यांची पोटॅशियम पातळी खालावली असून जीव धोक्यात असल्याचे सांगितले जात आहे. आम्ही वारंवार मागणी करूनही प्रशासन आम्हाला वैद्यकीय अहवाल दाखवण्यास तयार नाही. सोनम वांगचुक यांना जबरदस्तीने रुग्णालयात नेले असले, तरी लडाखचा लढा थांबणार नाही. आगामी सोमवारचा नियोजित मोर्चा ठरल्याप्रमाणेच होईल, असे गीतांजली वांगचुक यांनी म्हटले आहे.

ताज्या बातम्या

राज-का-रण : पप्पू पास हो गया..

0
नाशिक | शैलेंद्र तनपुरे - दै. 'देशदूत'- संपादक काँग्रेस पक्षाने आपल्या कार्यपद्धतीत आमूलाग्र बदल करण्यास सुरुवात केली, याचे एक उत्तम आणि आश्वासक उदाहरण नुकतेच नाशिकमध्ये...