Sunday, October 18, 2026
Homeब्रेकिंग न्यूजAccident News : तुळजापूरला दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांच्या कारचा भीषण अपघात; ५ जणांचा...

Accident News : तुळजापूरला दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांच्या कारचा भीषण अपघात; ५ जणांचा मृत्यू, १ गंभीर

बीड | Beed

बीड जिल्ह्यातील (Beed District) माजलगाव तालुक्यात (Majalgaon Taluka) खामगाव-पंढरपूर राष्ट्रीय महामार्गावरील शिंदेवाडी फाट्याजवळ आज (रविवारी) सकाळी ११ वाजेच्या सुमारास एक अत्यंत भीषण अपघात घडला. तुळजापूर येथे श्री तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या कारला एसटी बसने जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात कारमधील ५ जणांचा जागीच मृत्यू (Death) झाला असून, १ जण गंभीर जखमी झाला आहे. अपघाताच्या घटनेनंतर संतप्त ग्रामस्थांनी महामार्गावर उतरून तब्बल काही काळ रास्ता रोको आंदोलन केले.

- Advertisement -

कारचा झाला चुराडा

मिळालेल्या माहितीनुसार, माजलगाव येथील भाविकांचे एक कुटुंब कारने तुळजापूरच्या (Tuljapur) दिशेने जात होते. शिंदेवाडी फाट्याजवळ आले असता, कार थेट समोरून येणाऱ्या एसटी बसवर जाऊन धडकली. ही धडक इतकी भीषण होती की, कारचा आणि बसच्या पुढील भागाचा अक्षरशः चुराडा झाला.या घटनेचे अंगावर काटा आणणारे सीसीटीव्ही (CCTV) फुटेजही समोर आले आहे. यामध्ये सामान्य वाहतूक सुरू असताना अचानक अनियंत्रित झालेली कार एसटी बसला थेट धडकत असल्याचे दिसत आहे.

हे देखील वाचा : Accident News : मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरमध्ये भीषण अपघात; अनियंत्रित ट्रकने १५ भाविकांना चिरडले, ३९ जखमी

खराब रस्त्यामुळे अपघात झाल्याचा ग्रामस्थांचा आरोप

अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी (Police) तातडीने घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले आणि मदतकार्य सुरू केले. मात्र, या दुर्घटनेनंतर शिंदेवाडी परिसरातील ग्रामस्थ प्रचंड आक्रमक झाले. खामगाव-पंढरपूर महामार्गावरील माजलगाव-तेलगाव-धारूर मार्गाची अत्यंत दुरवस्था झाली असून, रस्त्यावर मोठे खड्डे, मधोमध पडलेल्या भेगा आणि धोकादायक जंपमुळेच हे अपघात (Accident) होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला.

हे देखील वाचा : Nashik Accident News : भरधाव कारच्या धडकेत पोलीस उपनिरीक्षकाचा मृत्यू; पाच जखमी

वर्षभरात ५० ते ७० नागरिकांना अपघातात गमवावे लागले प्राण

गेल्या वर्षभरात या महामार्गावर सुमारे ५० ते ७० नागरिकांना अपघातात प्राण गमवावे लागले आहेत. वारंवार निवेदने देऊनही प्रशासन व लोकप्रतिनिधी दुर्लक्ष करत असल्याने संतप्त ग्रामस्थांनी महामार्गावर ‘रास्ता रोको’ आंदोलन केले. निष्काळजीपणा करणाऱ्या संबंधित रस्त्याच्या कॉन्ट्रॅक्टरवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची जोरदार मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

हे देखील वाचा : Kolkata Tragedy : कोलकाता दुर्गापूजा मंडप दुर्घटनेतील मृतांचा आकडा १९ वर; सात जण अटकेत

अपघातातील मृतांची नावे

१. गजानन महादेव नामदास (वय ३८)
२. माऊली गजानन नामदास (वय ११)
३. ओमकार महादेव गिरी (वय २४)
४. सोमनाथ बडे (वय २३)
५. अनिल आचार्य (वय ४०)

ताज्या बातम्या

Nashik Crime News : “मी परिसराचा भाई आहे, एकेकाचा मुडदा…”; दूध...

0
​नाशिक | प्रतिनिधी | Nashik घराजवळ (House) संशयास्पदरीत्या थांबल्याचे विचारल्याच्या कारणातून स्थानिक गुंडांनी एका ३५ वर्षीय दूध व्यावसायिकावर व त्याच्या मित्रावर दांडके आणि फळीने बेदम...