Tuesday, March 31, 2026
Homeक्राईमAshok Kharat Crime : धर्माच्या नावाखाली वासनेचा बाजार; खरातवर महिला अत्याचाराचे 'इतके' तर...

Ashok Kharat Crime : धर्माच्या नावाखाली वासनेचा बाजार; खरातवर महिला अत्याचाराचे ‘इतके’ तर फसवणुकीचे दोन गुन्हे

एकूण गुन्ह्यांची संख्या किती?

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

स्वतःला कधी ‘कृष्णाचा तर कधी ‘महादेवाचा अवतार’ सांगून भक्तांना जाळ्यात ओढणाऱ्या भोंदू बाबा कॅप्टन अशोक खरात (Ashok Kharat) याचे काळे कारनामे एकामागून एक समोर येत आहेत. नाशिकच्या कॅनडा कॉर्नर भागात ‘ओकस् लॅण्ड डेव्हलपर्स’च्या नावाखाली भोंदूपणाचे दुकान थाटणाऱ्या खरातवर शुक्रवारी (दि. २७) आणखी दोन गंभीर गुन्हे दाखल झाले आहेत. यामध्ये एका शेतकरी महिलेवर गुंगीचे औषध देऊन अत्याचार केल्याचा आणि एका कापड व्यावसायिकाची लाखो रुपयांची फसवणूक केल्याचे नमूद आहे. त्यामुळे खरातवरील गुन्ह्यांची संख्या आता दहावर पोहोचली आहे.

- Advertisement -

हे देखील वाचा : Ashok Kharat Crime News : भोंदू अशोक खरातच्या अडचणीत वाढ; पोलीस कोठडी पुन्हा वाढवली, आज कोर्टात नेमकं काय घडलं? वाचा A टू Z माहिती

सिन्नरच्या मिरगाव येथील एका पीडित शेतकरी (Farmer) महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार, कौटुंबिक वाद मिटवण्यासाठी नातेवाईकांनी तिला २०२२ मध्ये खरातकडे नेले होते. खरातच्या सांगण्यावरून पती-पत्नी पुन्हा एकत्र राहू लागल्याने त्यांचा खरातवर विश्वास बसला. याचाच फायदा घेत ऑगस्ट २०२४ मध्ये खरातने पतीला ऑफिसबाहेर जाण्या सांगून आणि पीडितेला तांब्याच्या भांड्यातील काहीतरी पेय प्यायला दिला. त्यानंतर तिला गुंगी आली असता, खरातने मी महादेवाचा अवतार आहे असे भासवून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला.

हे देखील वाचा :  Ashok Kharat Case : माणिकराव कोकाटेंना मंत्री करू नये म्हणून खरातचा सुनील तटकरेंना फोन; शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्याचा गंभीर आरोप

तसेच जर कोणाला काही सांगितले, तर दैवी शक्तीने तुझ्या मुलांना (Boys) मारून टाकीन आणि तुझे आयुष्य उदध्वस्त करीन, अशी धमकी त्याने दिली. या भीतीपोटी पीडितेने डिसेंबर २०२४ पर्यंत चार वेळा हा अत्याचार सहन केला. मात्र, खरातच्या कुकर्माचा ढिग बाहेर येताच व तो अटकेत असल्याचे समजताच तिने हिंमत एकवटून सरकारवाडा पोलीस ठाणे (Sarkarwada Police Station) गाठले व तक्रार दिली.

हे देखील वाचा : Rupali Chakankar : अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT च्या रडारवर; चौकशीसाठी बजावले समन्स

गुन्ह्यांचे दशक; आज पुकारा!

नाशिकचा जेफ्री एप्स्टिन अशोक खरातवर आतापर्यंत बलात्काराचे ८ आणि फसवणुकीचे २ असे एकूण दहा गुन्हे दाखल झाले आहेत. त्याच्या पोलीस कोठडीची मुदत आज (दि. २९) संपत असून, कडेकोट पोलीस बंदोबस्तात त्याला न्यायालयात (Court) हजर केले जाणार आहे. दरम्यान, एसआयटीचे अधिकारी किरणकुमार सूर्यवंशी आणि पोलीस निरीक्षक तृप्ती सोनवणे हे न्यायालयात दाखल गुन्ह्यांत आतापर्यंतच्या तपासातील प्रगती, दिशा यांची माहिती देणार आहे. दरम्यान, पुन्हा एसआयटी खरातकडे आणखी तपास करण्याच्या दृष्टीने वाढीव पोलीस कोठडीची मागणी करण्याची शक्यता आहे.

हे देखील वाचा :  Ashok Kharat Case : खरातची ‘शस्त्र कुंडली’ उघड; पोलीस रेकॉर्डमधून पुरावेच गायब

‘कृष्ण अवतार’ सांगून फसवणूक

अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा येथील कापड व्यावसायिक राजेंद्र भागवत यांची खरातने फसवणूक केली, व्यवसायातील अडचणी दूर करण्यासाठी खरातने स्वतःला ‘कृष्णाचा अवतार’ असल्याचे सांगितले. मी मंत्रांनी सिद्ध केलेला पुष्कराज रत्न आणि हिरा देतो, त्याने व्यवसायात वृद्धी होईल, असे आमिष दाखवून त्याने भागवत यांच्याकडून २० ग्रॅम वजनाच्या तीन सोन्याच्या अंगठ्या आणि २ लाख ६२ हजार रुपये रोख उकळले. काही दिवसांनी खरातने त्यांना तांब्याच्या अंगठ्यांमध्ये खोटे खडे बसवून दिले. व्यवसायात सुधारणा न झाल्याने आणि खरातला अटक झाल्याचे समजताच भागवत यांनी रत्नांची तपासणी केली असता, केवळ पाच हजार रुपयांचे खोटे रत्न, अंगठ्या व खडे देऊन त्यांची फसवणूक केल्याचे उघड झाले. वरील दोन्ही गुन्हे आता एसआयटीकडे वर्ग करण्यात आले आहेत.

हे देखील वाचा :  Ashok Kharat Case : भोंदू अशोक खरातला आज न्यायालयात हजर करणार; SIT कडून कोठडीची मुदत वाढवून मागितली जाणार?

ताज्या बातम्या

Ashok Kharat Crime News : खरातने यूट्यूबर्सनाही केले मालामाल; कर्जदारांमध्ये खुशीची लहर

0
सिन्नर | विलास पाटील | Sinnar व्यवसायात बरकत करून देतो म्हणून अनेक भक्तांना वेगवेगळे मार्ग दाखवून गंडवणाऱ्या कॅप्टन अशोककुमार खरात (Ashok Kharat) याच्यामुळे मालामाल झाल्याचे...