Sunday, April 12, 2026
Homeब्रेकिंग न्यूजAnjali Damania : DCM शिंदेंच्या पीएचे खरातसोबत कॉल, समता पतसंस्थेतही अनेक व्यवहार;...

Anjali Damania : DCM शिंदेंच्या पीएचे खरातसोबत कॉल, समता पतसंस्थेतही अनेक व्यवहार; सीडीआर कुठून मिळाला? दमानिया यांनी पत्रकार परिषदेत सगळंच सांगितलं

मुंबई | Mumbai

सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी भोंदू अशोक खरात (Ashok Kharat) आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यात १७ फोन संभाषणे झाल्याचा दावा करत सीडीआर (कॉल डिटेल रेकॉर्ड्स) समोर आणला होता. त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली होती. यानंतर विरोधी पक्षांनी अंजली दमानिया (Anjali Damania) यांच्याकडे अशोक खरातचा सीडीआर कुठून आला? असा प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर आज (सोमवारी) दमानिया यांनी पत्रकार परिषद घेत याबाबत खुलासा केला आहे. यावेळी त्यांना अश्रू अनावर झाल्याचे दिसून आले.

- Advertisement -

हे देखील वाचा : Baramati By Election 2026 : बारामती विधानसभेच्या पोटनिवडणुकीतून ‘या’ बड्या नेत्याची माघार; DCM सुनेत्रा पवारांचा मार्ग मोकळा?

यावेळी त्या म्हणाल्या की, “माझ्याबद्दल गेल्या तीन ते चार दिवसांपासून चर्चा सुरु असून, अटकेची मागणी केली जात आहे. मी बाहेर असल्यामुळे मला त्याबाबत प्रतिक्रिया देता येत नव्हती. मला या प्रकरणाबाबत सुरुवातीपासून सगळं सांगायचं आहे. ०१ एप्रिलला दुपारी ०१ वाजता मला एक फोन आला की खरातची माहिती माझ्याकडे आहे, त्याचा सीडीआर माझ्याकडे आहे. दुसऱ्या एका नंबरवरुन त्याने मला सीडीआरची (CDR) एक्सेल शीट मागितली. सदर व्यक्ती प्रायववेट डिटेक्टीव होती, त्याची कंपनी होती. या व्यक्तीची कंपनी, व्यक्ती याची माहिती तपासणी केली, ती योग्य होती. एक्सेल शीटवरील माहिती मी क्लाउड अॅपवर टाकली त्यातून मला फोन नंबर कुणाचे हे कळले. मी ही माहिती सर्वप्रथम पोलीस महासंचालक सदानंद दाते यांना पाठवली”, असे अंजली दमानिया यांनी म्हटले.

हे देखील वाचा : Rahuri By Election 2026 : राहुरीत उमेदवारी अर्ज दाखल करण्याआधी मोठ्या राजकीय घडामोडी; भाजप प्रदेशाध्यक्ष चव्हाण, पालकमंत्री विखे पाटलांची प्राजक्त तनपुरेंशी बंद दाराआड चर्चा, काय ठरलं?

पुढे त्या म्हणाल्या, “हे सर्व सीडीआर मी पूर्ण तपासले असता त्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उदय सामंत,भागवत कराड, पंकजा मुंडे, धनंजय मुंडे, अब्दुल सत्तार, रामदास कदम, योगेश कदम, राधाकृष्ण विखे पाटील, सुषमा अंधारे, संजय राऊत, बच्चू कडू, राम कदम, प्रसाद लाड यापैकी एकाचाही कॉल आढळला नाही. मात्र, मिलिंद नार्वेकर यांचे आठ फोन आले, यावर अंधारे काहीच बोलत नाहीत. त्यामुळे लढायचे नेमकं कोणासोबत अंधारे बाई? तुम्ही राजकारण करत आहात. यात समरी येते, इन्कमिंग, आऊटगोईंग, सर्वात मोठे कॉल अशी माहिती येते”, असे दमानिया यांनी म्हटले.

हे देखील वाचा : Ashok Kharat Crime : खरातच्या घरात पोतेभर पैसा; मुंबईच्या पंचतारांकित हॉटेलमधून हवाला रॅकेट!

तसेच “मिलिंद नार्वेकर यांच्यासोबत मंत्री संजय शिरसाट यांचेही कॉल रेकॉर्ड खरातसोबत मिळाले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे स्वीय सहाय्यक प्रभाकर काळे यांचेही कॉल आहेत. फोन काळेंनी केले की शिंदेंनी? याबाबत मला घेणं देणं नाही. मात्र,याची चौकशी झाली पाहिजे. सुनिल तटकरे, आशिष शेलार, रुपाली चाकणकर यांनी फोन का केले? केसरकर यांच्या पीएने देखील फोन केले आहेत. मात्र, सीएम लॉबीचे फोन नाही, त्याला मी काय करु? फालतू काहीही बोलायचं. आज दुपारी चार वाजता सदानंद दाते यांनी मला वेळ दिली आहे. त्यामुळे सीडीआर मला कुठून आला आणि त्यात कोणाचे नंबर आहेत हे सर्व त्यांनाच शोधू दे”, असेही अंजली दमानिया म्हणाल्या.

हे देखील वाचा : Ashok Kharat Crime : तगादा लावू नकोस, अन्यथा देवाचा कोप होईल; खरातने कांदा व्यापार्‍यालाही धमकावले

अजितदादांच्या अपघाताआधी आणि नंतर खरातच्या समता पतसंस्थेत अनेक व्यवहार झाल्याचा दमानिया यांचा दावा

यावेळी अंजली दमानिया म्हणाल्या की, अजित पवारांचा (Ajit Pawar) अपघात होण्याच्या आदल्या दिवशी म्हणजेच २७ जानेवारीला समता पतसंस्थेत १७, अपघाताच्या दिवशी म्हणजे २८ जानेवारीला १९, त्यानंतर पुढील तीन दिवस अनुक्रमे १०, ८ आणि ८ व्यवहार झाले.हे सगळे एका दिवसाचे मेसेज आहे. या पतसंस्थेत एवढे मेसेज महिन्याला देखील येत नव्हते, तेवढे केवळ एका दिवसांत समता पतसंस्थेकडून आले आहेत. म्हणजे काय झालं? हा सगळा तपशील मी एसआयटीकडे देऊन, यात काय झालं? याची चौकशी करण्याची मागणी करणार आहे, यात हे सगळे व्यवहार कुणी केले? पैशांची फिरवाफिरवी झाली का? या सगळ्या गोष्टी बाहेर आल्या पाहिजेत, अशी मागणी दमानिया यांनी केली. तसेच खरातच्या खात्यात पैसे डिपॉझिट झाले की काढले गेलेत, हे त्यांना शोधायचे आहेत. शिंदेंचे इतके कॉल बाहेर काढायची यंत्रणेची हिंमत आहे का? शिंदेंना विचारायची गरज नाही का? इतके कॉल का केले? माझे डोळे झिजले पण मी ते शोधले, असे म्हणताच अंजली दमानिया यांना पत्रकार परिषदेत अश्रू अनावर झाल्याचे पाहायला मिळाले.

हे देखील वाचा :  Ashok Kharat Crime : खरात व्यतिरिक्त बड्यांवर SIT ची मेहेरनजर? चौकशी सत्रापुरताच तपास


ताज्या बातम्या

Asha Bhosle Passed Away : आशाताईंच्या निधनामुळे मंगेशकर कुटुंबातील दुसरा तारा हरपला...

0
मुंबई | Mumbai ज्येष्ठ पार्श्वगायिका आशा भोसले (Asha Bhosle) यांचे वयाच्या ९३ व्या वर्षी निधन (Passed Away) झाले आहे. काल (शनिवारी) रात्री त्यांना हृदय विकाराचा...