Thursday, June 4, 2026
Homeब्रेकिंग न्यूजBaramati By Election 2026 : बारामती पोटनिवडणूकीचा बिनविरोधाचा मार्ग मोकळा; काँग्रेस उमेदवार...

Baramati By Election 2026 : बारामती पोटनिवडणूकीचा बिनविरोधाचा मार्ग मोकळा; काँग्रेस उमेदवार माघार घेणार, प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांची घोषणा

मुंबई | Mumbai

राज्यातील बारामती आणि विधानसभेच्या (Baramati and Rahuri Assembly) पोटनिवडणुकीसाठी येत्या २३ एप्रिल रोजी मतदान (Voting) पार पडणार आहे. या निवडणुकीकरिता आज (गुरुवारी) दुपारी तीन वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस असून, बारामतीमध्ये मोठी घडामोड घडली आहे. बारामती विधानसभेच्या पोटनिवडणुकीतून काँग्रेसने आपल्या उमेदवाराचा अर्ज मागे घेण्याचा निर्णय घेतल्याची घोषणा प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे. त्यामुळे आता उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा विधानसभेवर जाण्याचा मार्ग सुकर झाला आहे.

- Advertisement -

हे देखील वाचा : Rohit Pawar : काकीसाठी पुतण्या मैदानात; आमदार रोहित पवारांनी घेतली काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांची भेट, बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध होणार?

मुंबईतील (Mumbai) गांधी भवन येथे झालेल्या पत्रकार परिषदेत हर्षवर्धन सपकाळ (Harshwardhan Sapkal) यांनी उमेदवारी मागे घेत असल्याचा निर्णय जाहीर केला. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्ष भाजपसोबत (BJP) आहे असे म्हणत जोरदार टीका केली. ते म्हणाले की, “महाराष्ट्रात दोन पोटनिवडणुका होत असून, सर्वांचे लक्ष बारामतीकडे लागले आहे. वैचारिक भूमिका म्हणून भाजपला विरोध करण्यासाठी निवडणूकीत अर्ज भरला होता.बारामती नव्हे तर देशभरात भाजपच्या विरोधात काँग्रेसने भूमिका घेतली होती. आमदार रोहित पवारांनी आज (गुरुवारी) पहाटे भेट घेऊन बारामतीची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी विनंती केली. तसेच अजित पवार यांच्या संदर्भात सहकार्याची भूमिका घ्या असे देखील रोहित पवारांनी म्हटल्याचे सपकाळ यांनी सांगितले.

हे देखील वाचा : Baramati By Election 2026 : बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले

पुढे ते म्हणाले की, “काही जणांनी अपरिपक्व वक्तव्य केली, त्यासंदर्भात कुटुंबांनी दिलगिरी व्यक्त केली. शरद पवार आणि सुप्रिया सुळे (Sharad Pawar and Supriya Sule) यांनी देखील विनंती आणि सूचना केल्या. यानंतर सर्व काँग्रेस नेतृत्वाबाबत चर्चा केली.लढले पाहिजे ही आमची भूमिका आहे. मात्र संस्कृती आणि संवेदना म्हणून आम्ही बारामतीच्या पोटनिवडणुकीतून माघार घेण्याचा निर्णय घेतला”, असे काँग्रेस (Congress) प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले. तसेच अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून अजित पवार (NCP Ajit Pawar) हे राज्याचे नेते होते त्यांनी आमच्यासोबत देखील काम केले आहे. त्यामुळे या भावनिक भूमिकेमुळे आम्ही निवडणुकीतून माघार घ्यावी, अशी विनंती करण्यात आली होती”, असेही ते म्हणाले.

हे देखील वाचा : Assembly Election 2026 : आसाम, केरळ आणि पुदुचेरीमध्ये सकाळपासून मतदान सुरु; २९६ जागांसाठी १ हजार ९९५ उमेदवार रिंगणात

ताज्या बातम्या

बिनविरोध

मतदानाआधीच महायुतीकडून ‘या’ जागा बिनविरोध; मविआला धक्क्यावर धक्के

0
मुंबई | Mumbaiराज्यात १७ जागांसाठी विधान परिषदेच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरु आहे. या निवडणुकीत जिल्हा परिषद निवडणुकीतील बिनविरोधचा ट्रेंड कायम असल्याचे चित्र पहायला मिळत आहे....