घोटी | वार्ताहर | Ghoti
इगतपुरी तालुक्यातील (Igatpuri Taluka) घोटी ते त्र्यंबकेश्वर मार्गावर (Ghoti and Trimbakeshwar) कोरपगाव नजीक झालेल्या भीषण अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर एक महिला गंभीर जखमी झाली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

हे देखील वाचा : Ashok Kharat Case : भोंदू खरातला तिसऱ्या गुन्ह्यात ‘इतक्या’ दिवसांची न्यायालयीन कोठडी
मिळालेल्या माहितीनुसार, वैतरणा बाजूकडून घोटीच्या दिशेने येणाऱ्या एका कारने त्र्यंबकेश्वर तालुक्यातील पहिने गावाकडे जाणाऱ्या मोटारसायकलला जोरदार धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की मोटारसायकलचा पूर्णपणे चक्काचूर झाला. हा अपघात घाटातील धोकादायक वळणावर समोरासमोर झाल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. या अपघातात (Accident) मोटारसायकलवरील तिघांपैकी सखाराम वसंत पवार (वय ४०, रा. सामुंडी, ता. त्र्यंबकेश्वर) आणि किसन चेतू मुकणे (वय ६०, रा. पहिने, ता. त्र्यंबकेश्वर) यांचा जागीच मृत्यू झाला. तर मंदा सखाराम पवार (वय ३६, रा. सामुंडी, ता. त्र्यंबकेश्वर) या गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
हे देखील वाचा : Ashok Kharat Case : खरात प्रकरणात ईडीची नाशिकसह ११ ठिकाणी छापेमारी; मिरगाव जवळील फार्म हाऊसवरही सर्च ऑपरेशन
अपघाताची माहिती मिळताच घोटी पोलीस ठाण्याचे (Ghoti Police Station) पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलीस निरीक्षक विजय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली जखमी महिलेला तातडीने घोटी ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. तसेच मृतदेह ताब्यात घेऊन पुढील प्रक्रिया सुरू करण्यात आली. यावेळी पोलीस उपनिरीक्षक प्रतीक भिंगारदे, गुरुदेव मोरे, आहिराव यांच्यासह पोलीस कर्मचारी घटनास्थळी उपस्थित होते.
हे देखील वाचा : Ashok Kharat Crime : खरातच्या अड्ड्यातून ‘मळकट द्रव्य’ जप्त; न्यायालयीन कोठडी की पुन्हा कोठडी? आज ‘व्हीसी’द्वारे फैसला
दरम्यान, या अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, वेग आणि घाटातील तीव्र वळण हे संभाव्य कारण मानले जात आहे. या घटनेमुळे घोटी-त्र्यंबकेश्वर मार्गावरील वाहतुकीबाबत पुन्हा एकदा सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. स्थानिक नागरिकांनी (Citizen) या मार्गावर योग्य ती उपाय योजना करण्याची मागणी केली आहे.
हे देखील वाचा : Nashik MHADA Fraud : म्हाडा घरकुल फसवणूक प्रकरणाच्या चौकशीसाठी SIT स्थापन; आयुक्त गेडाम-कर्णिक यांच्यासह सहा जणांचा समावेश




