Thursday, June 4, 2026
Homeब्रेकिंग न्यूज​Nashik Crime : बॅनरवर फोटो खाली लावल्याने 'इगो' दुखावला; सराईताने विद्यार्थ्याला थेट...

​Nashik Crime : बॅनरवर फोटो खाली लावल्याने ‘इगो’ दुखावला; सराईताने विद्यार्थ्याला थेट डांबून मारहाण केली

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

कॉलेज निवडणुकीच्या (College Election) बॅनरवर ‘आपला फोटो खाली का लावला?’ या केवळ एका क्षुल्लक कारणावरून सराईताचा ‘स्वाभिमान’ दुखावला गेला. या दुखावलेल्या इगोतून त्याने चक्क पदवीधर विद्यार्थ्यासह काही मित्रांचे मिनी बसमधून अपहरण करीत रात्रभर डांबून ठेवले आणि एका विद्यार्थ्यास जीवे मारण्याची धमकी देऊन दहा हजारांची ऑनलाईन खंडणी उकळल्याचा खळबळजनक प्रकार सातपूर परिसरात उघडकीस आला आहे. सातपूर पोलिसांनी सराईत गुन्हेगार गौरव घुगे याच्यासह त्याच्या साथीदारांवर गुन्हा दाखल केला असून तिघांचा शाेध सुरु आहे. 

- Advertisement -

हे देखील वाचा : Nashik Crime : मुलाने जन्मदात्या बापाचा काढला काटा; पोलिसांनी ठोकल्या बेड्या, वडिलांची मृत्युशी झुंज ठरली अपयशी

 त्र्यंबक रोडवरील महिरावणी शिवारात संदीप फाऊंडेशनमध्ये (Sandeep Foundation) शिक्षण घेणारा साहिल दीपकराव दहले (२१) हा तेलंगणातील विद्यार्थी असून ताे शिक्षणानिमित्त ध्रुवनगर परिसरात वास्तव्यास आहे. त्याने कॉलेजमधील ‘जीएस’ निवडणुकीच्या प्रचारासाठी मित्रांच्या मदतीने काही बॅनर लावले. यातील एका बॅनरवर काॅलेजच्या आत व बाहेर टवाळखाेरी व गुंडगिरी करणारा संशयित गौरव घुगे याचा फोटो शेवटी होता. ‘हा फोटो खाली का लावला’, या कारणातून गौरवचा इगो दुखावला गेला आणि त्याने १६ मार्चला रात्री साडे नऊच्या सुमारास साहिलला फोन करून पिंपळगाव बहुला येथील मोकळ्या जागेत बोलावून घेतले.

हे देखील वाचा : Nashik Crime : दहा महिन्यांपासून पोलिसांना चकवा; अखेर कुख्यात गुंड पाटणकरच्या मुसक्या आवळल्या

साहिल पोहोचताच गौरव आणि त्याच्या दोन अनोळखी साथीदारांनी त्याला गाठले. “आमचा फोटो बॅनरवर खाली का टाकला?” अशी कुरापत काढून त्यांनी साहिलला आणि त्याच्या मित्राला बळजबरीने एका मिनी बसमध्ये कोंडले. तिथून त्यांना पिंपळगाव बहुला येथील एका बंद खोलीत नेऊन डांबले. रात्रभर चाललेल्या या दहशतीच्या खेळात संशयितांनी मद्य पिऊन साहिलला शिवीगाळ करत बेदम मारहाण केली. तसेच, वीस हजार रुपयांच्या खंडणीची मागणी केली. अखेर जीवाच्या भीतीने साहिलने मोबाईलवरून १० हजार रुपये घुगे व साथीदारांच्या खात्यावर ‘फोन-पे’ द्वारे ट्रान्सफर केले.

हे देखील वाचा : Ashok Kharat Crime News : ‘स्वघोषित कॅप्टन’चा धक्कादायक कांड; ऑफिसबाहेर लोकांच्या रांगा तरीही महिलेसोबत…

​सराईताची मुजोरी

साहिलला १७ मार्चच्या सकाळी ८ वाजेपर्यंत डांबून ठेवले. “उर्वरित १० हजार रुपये संध्याकाळपर्यंत दिले नाहीत, तर तुला पुन्हा उचलून नेऊ,” अशी उघड धमकी देऊन त्याला सोडून दिले. आता संशयितांचा शाेध सुरु असून त्यांच्या अटकेनंतरच घटना आणि गुन्हा अधिक स्पष्ट हाेणार आहे.

हे देखील वाचा : Ashok Kharat Nashik Crime News : शहरात दोन अलिशान बंगले, मिरगावला फार्म हाऊस तर पाथर्डीत ३० एकर…; वासनांध अशोक खरातकडे कोट्यवधींची प्रॉपर्टी


ताज्या बातम्या

Shrirampur : श्रीरामपुरात एटीएसची छापेमारी; चौघांची चौकशी

0
श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur शहरात महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) दाखल होत कारवाई केली, शहराच्या विविध भागांतील सात ते आठ ठिकाणी एकाचवेळी छापे टाकले. सोशल मीडियाच्या...