Sunday, April 12, 2026
Homeब्रेकिंग न्यूजAshok Kharat Crime News : भोंदू खरातला दुसऱ्या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडी; उद्या...

Ashok Kharat Crime News : भोंदू खरातला दुसऱ्या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा कोर्टात हजर केले जाणार, आजच्या सुनावणीत काय घडलं?

नाशिक | Nashik

भोंदूगिरीच्या नावाखाली महिलांचे लैंगिक शोषण करणाऱ्या अशोक खरातला (Ashok Kharat) दुसऱ्या गुन्ह्यात नाशिक सत्र न्यायालयाने (Nashik Sessions Court) बुधवार (दि.८ एप्रिलपर्यंत) पोलीस कोठडी सुनावली होती. या पोलीस कोठडीची (Police Custody) मुदत आज (बुधवारी) संपल्यानंतर त्याला व्हिडीओ कॉनफरन्सद्वारे नाशिक सत्र न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयीन कोठडी मिळाली आहे. त्यामुळे आता खरातची रवानगी नाशिक मध्यवर्ती कारागृहात होणार आहे.

- Advertisement -

हे देखील वाचा : Ashok Kharat Case : भोंदू खरात महिलांना जाळ्यात कसा ओढायचा? SIT प्रमुख तेजस्वी सातपुते यांनी पत्रकार परिषदेत दिली धक्कादायक माहिती

याबाबत अधिक माहिती अशी की, अशोक खरातला नाशिक मध्यवर्ती कारागृहात दाखल केल्यानंतर लगेचच त्याचा ताबा एसआयटी (SIT) घेणार आहे. खरातच्या पुढील गुन्ह्याचा ताबा मिळावा यासाठी आज न्यायालयात अर्ज केला जाणार असून, त्याबाबतची कायदेशीर प्रक्रिया आजच पूर्ण केली जाणार आहे. तसेच त्याला उद्या पुन्हा न्यायालयात (Court) हजर करण्याचे आदेश नाशिक सत्र न्यायालयाने दिले आहेत.

हे देखील वाचा : Ashok Kharat Crime : तब्बल ११२ पतसंस्था ‘सहकार’च्या रडारवर! सिन्नर-कोपरगाव-शिर्डी पट्ट्यात चौकशी

दरम्यान, आजच्या सुनावणीनंतर माध्यमांशी संवाद साधताना सरकारी वकील शैलेंद्र बागडे म्हणाले की, संशयित आरोपी अशोक खरातविरुद्ध हा दुसरा गुन्हा (Second Case) होता. याप्रकरणी आज त्याला न्यायालयीन कोठडी देण्यात आली. त्यानंतर तिसऱ्या गुन्ह्यात ताब्यात घेण्याचा अर्ज मंजूर केला असून, उद्या पुन्हा खरातला न्यायालयात हजर केले जाईल, असे त्यांनी म्हटले.

हे देखील वाचा : Ashok Kharat Crime : खरातच्या जाळ्यात मुंबईचे उद्योजक; कोट्यवधींच्या मनी लाँड्रिंगचा शिर्डीतून पर्दाफाश, तेरावा गुन्हा नोंद

ताज्या बातम्या

Nashik Suicide News : परिचारिकेची रुग्णालयात आत्महत्या

0
नाशिकरोड | प्रतिनिधी | Nashik Road येथील एका नामांकित रुग्णालयात (Hospital) शिकाऊ परिचारिका म्हणून कार्यरत असलेल्या २५ वर्षीय तरुणीने रुग्णालयाच्या निवासस्थानी गळफास घेऊन आत्महत्या (Suicide)...