साकोरा | प्रतिनिधी | Sakora
नांदगाव तालुक्यातील (Nandgaon Taluka) साकोरा परिसरात (Sakora Area) आजचा दिवस अत्यंत वेदनादायी ठरला असून, दोन कष्टाळू तरुण शेतकऱ्यांचा विजेचा शॉक (Electric Shock) लागून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडल्याने साकोरा गावावर शोककळा पसरली आहे.
हे देखील वाचा : Nashik News : कर्तव्याचा मार्ग ठरला शेवटचा प्रवास; होमगार्डचा हृदयविकाराने मृत्यू
याबाबत अधिक माहिती अशी की, पांझण नदीपात्रात गेल्या काही वर्षांपासून पन्नास ते साठ शेतकऱ्यांचे (Farmer) विजपंप कार्यरत आहेत. आज (गुरुवारी) सकाळी अकरा ते बारा वाजेदरम्यान साकोरा येथील शिरीष भगवान पठाडे(४२) व जगदिश तुकाराम खैरनार (३६) हे दोघे तरूण शेतकरी पांझण नदीवर वीज पंप सुरू करण्यासाठी गेले. मात्र, वीज पंप पाण्याबाहेर असल्याने तो पाण्यात खेचण्याच्या प्रयत्नात पाण्यात अचानक वीज पुरवठा सुरू झाल्याने दोन्ही शेतकर्यांना विजेचा तीव्र झटका बसला. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.या घटनेची माहिती गावात समजताच संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
हे देखील वाचा : Nashik News : धर्मांतर, अत्याचारप्रकरणी कठोर कारवाई करा – सकल हिंदू समाजाची मागणी
नशीबाचा क्रूर खेळ
या दुर्घटनेतील धक्कादायक आणि मनाला चटका लावणारी बाब म्हणजे जगदीश खैरनार यांचा भूतकाळ होय. वीस वर्षांपूर्वी जगदीश खैरनार यांच्या घरावर वीज कोसळल्याने लागलेल्या भीषण आगीत एकाचवेळी घरातील सहा जणांचा मृत्यू (Death) झाला होता. यापैकी खैरनार पिता-पुत्र यांचा मृत्यूशी झुंज देताना जीव वाचला होता. मात्र, आज पुन्हा काळाने जगदीशवर झडप घातली आणि यावेळी त्यांना सावरण्याची संधीही मिळाली नाही.
हे देखील वाचा : Ashok Kharat Case : पोलिसांना ‘कल्पना’च नाही ! खरातची पत्नी दोन आठवड्यांपासून गायब; अटकपूर्व जामिनासाठी अर्ज
तसेच काही महिन्यांपूर्वी शिरीष पठाडे यांच्या मोठ्या बंधुचे आकस्मिक निधन झाले होते. तरी देखील ते दुःख विसरून रविवार (दि.२६) रोजी मुलीचे लग्न असल्याने घरात सध्या आनंदाचे वातावरण होते. घरामध्ये लग्नाची जय्यत तयारी सुरू असताना अचानक वडीलांचे छत्र हरपल्याने पठाडे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. सदर घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी व पोलिसांनी पांझण नदीकाठी धाव घेऊन पंचनामा करून दोघांचेही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी नांदगाव ग्रामीण रूग्णालयात पाठवण्यात आले आहेत.




