नाशिक | प्रतिनिधी | Nashik
नाशिक महानगरपालिका (Municipal Corporation) आता उत्पन्नवाढीसाठी सरसावली असून, विविध पर्यायांच्या शोधाला वेग आला आहे. वाढत्या खर्चाचा ताळमेळ बसवताना पारंपरिक उत्पन्न स्रोत अपुरे पडत असल्याने प्रशासनाने मालमत्ता व्यवस्थापनातून महसूल वाढवण्यावर भर दिला आहे. याच पार्श्वभूमीवर मनपाच्या मालकीच्या मिळकतींचा व्यावसायिक वापर आणि नव्या प्रकल्पांद्वारे मोठ्या उत्पन्नाची आखणी करण्यात येत आहे.
हे देखील वाचा : Nashik Ravindra Erande Crime : एरंडेचा खरातप्रमाणेच अघोरी प्रथा, जादूटोणा; कार्यालयातून पक्ष्यांचे अवयव, सापाची कात, कवडी जप्त
मनपा उत्पन्नवाढीसाठी महाराष्ट्र महापालिका अधिनियम ७९ नुसार शहरातील (City) तरणतलाव, नाट्यगृहे, क्रीडा संकुले, क्रीडांगणे, उद्याने आदी मालम त्ता भाडेतत्त्वावर देऊन नियमित उत्पन्न वाढवण्याचा प्रयत्न करणार आहे. तसेच शहरातील अनेक मिळकती दीर्घकाळ अल्प वापरात असल्याने त्यांचा व्यावसायिक वापर करण्यावर भर दिला जाणार आहे. बीओटी तत्त्वावर (बांधा-वापरा-हस्तांतरण) शहरातील मनपाच्या विविध भूखंडांवर हे प्रकल्प राबवण्याचे नियोजन असून, केवळ या माध्यमातूनच सुमारे ११२ कोटींचे उत्पन्न (Income) अपेक्षित आहे. यात व्यावसायिक संकुले, पार्किंग प्रकल्प, क्रीडा सुविधा आदींचा समावेश असण्याची शक्यता आहे. सिंहस्थ २०२७ च्या पार्श्वभूमीवर शहरात पायाभूत सुविधा उभारण्यासाठी मोठ्या निधीची गरज भासणार आहे.
हे देखील वाचा : Nashik Bribe Crime : नाशिक झेडपीत लाचखोरीचा ‘व्हायरस’; ठाकरेंनंतर पेसांतर्गत शिक्षण विभागाचा बहाद्दर ‘एसीबी’च्या जाळ्यात
उद्दिष्टात वाढ
मनपाच्या मिळकत विभागाला २०२४-२५ मध्ये ४.७३ कोटींचे प्रत्यक्ष उत्पन्न मिळाले होते. तर २०२५-२६ मध्ये ८.५३ कोटींपर्यंत ते पोहोचले होते, आता मात्र २०२६-२७ साठी तब्बल ११६.७५ कोटींचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. अवघ्या दोन वर्षांत उत्पन्नात मोठी झेप घेण्याचा प्रयत्न मनपाकडून सुरू आहे. दरम्यान, नुकत्याच झालेल्या अंदाजपत्रकाच्या विशेष महासभेत महापौर हिमगौरी आहेर-आडके यांनीही उत्पन्नवाढीसाठी ठोस उपाययोजना करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या आहेत.
हे देखील वाचा : Nashik Crime News : महापालिकेच्या नावे डिजिटल धमकी; बनावट मेसेजमुळे नाशिककरांना मनस्ताप




