Thursday, June 18, 2026
HomeनाशिकNashik Vidhan Parisahd Election : गणेश गिते 'सर्वात श्रीमंत', तर नरेंद्र दराडेंवर...

Nashik Vidhan Parisahd Election : गणेश गिते ‘सर्वात श्रीमंत’, तर नरेंद्र दराडेंवर सर्वाधिक गुन्हे; विधानपरिषदेच्या कोणत्या उमेदवाराकडे किती संपत्ती?

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था विधानपरिषद निवडणुकीचे (Nashik Vidhan Parishad Election) वारे वाहत असतानाच, उमेदवारांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रांमुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. या निवडणुकीच्या (Election) रिंगणात असलेल्या उमेदवारांनी जाहीर केलेल्या संपत्तीचे आकडे थक्क करणारे असून, त्यात अपक्ष उमेदवार गणेश गिते यांनी सर्वाधिक संपत्तीसह बाजी मारली आहे.

- Advertisement -

गणेश गिते ‘सर्वात श्रीमंत’

निवडणूक रिंगणात असलेल्या उमेदवारांपैकी अपक्ष उमेदवार गणेश गिते (Ganesh Gite) हे सर्वात श्रीमंत उमेदवार ठरले आहेत. जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष आणि अपक्ष उमेदवार परवेझ कोकणी हे संपत्तीच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकावर आहेत. त्यांच्यावर एकही गुन्हा दाखल नसल्याचे प्रतिज्ञापत्रात नमूद आहे.

हे देखील वाचा : Sanjay Raut : “शिंदे गट पहिला क्रमांकाचा शत्रू, आमच्याकडील मते…”; राऊतांचे नाशिकमध्ये विधानपरिषदेच्या मतदानाबाबत मोठे वक्तव्य

नरेंद्र दराडे यांच्यापेक्षा पुत्र कुणाल अधिक श्रीमंत

शिवसेनेचे अधिकृत उमेदवार नरेंद्र दराडे यांच्यापेक्षा त्यांचे पुत्र कुणाल दराडे (Kunal Darade) अधिक श्रीमंत असल्याचे दिसून आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांवर, तसेच गोकुळ गिते आणि परवेझ कोकणी यांच्यावर कोणताही गुन्हा दाखल नसल्याचे स्पष्ट झाले आहे. उमेदवारांनी जाहीर केलेल्या या मालमत्ता आणि गुन्ह्यांच्या माहितीमुळे मतदारांच्या नजरा आता या निवडणुकीच्या निकालाकडे लागल्या आहेत.

कोणाच्या संपत्तीचे किती मूल्य?

विधानपरिषदेच्या निवडणूक रिंगणात असलेल्या उमेदवारांमध्ये अपक्ष उमेदवार गणेश गिते यांच्या संपत्तीचे मूल्य १५० कोटी आहे. तर परवेझ कोकणी यांच्या संपत्तीचे मूल्य १०२ कोटी आहे. त्यानंतर कुणाल दराडे यांच्याकडे १७ कोटी, नरेंद्र दराडे यांच्याकडे १ कोटी ८९ लाख रूपयांची संपत्ती आहे. तसेच सर्वात कमी संपत्ती गोरख बोडके यांच्याकडे असून, त्यांच्या संपत्तीचे मूल्य २ कोटी ८९ लाख इतके आहे.

हे देखील वाचा : Nashik Vidhan Parisahd Election : युतीच्या घटकपक्षांमध्ये नाराजी; दराडेंचा अर्ज भरण्यावेळी राष्ट्रवादीच्या आमदारांची पाठ तर कांदे गैरहजर

उमेदवारांची संपत्ती

१) नरेंद्र दराडे
शिक्षण : कला पदवीधर
व्यवसाय : शेती, बांधकाम व्यवसाय, हॉटेल
जंगम मालमत्ता : तीन कोटी ४२ लाख ३६ हजार ३७४
स्थावर मालमत्ता : पाच कोटी ९८ लाख ७६ हजार ६७५
कर्ज : ७७ लाख ९७ हजार ६४०
सोने : ७५ ग्रॅम
वाहन : ०१
गुन्हे : ०३ (फसवणुकीचा गुन्हा, चुकीचे कर्ज प्रकरण, विधान परिषद सदस्य नसताना चिन्ह वापरून पत्रव्यवहारे)

२) गणेश गिते
शिक्षण : एम.ए. (इकॉनिमिक्स)
व्यवसाय : शेती
जंगम मालमत्ता : ५१ कोटी ३१ लाख ५७ हजार ३६९
स्थावर मालमत्ता : ९९ कोटी ६३ लाख २६ हजार ४९९
कर्ज : ९५ कोटी ४६ लाख ८६ हजार ९५४
सोने : ३० तोळे
वाहन : २ (ट्रॅक्टर, कार)
गुन्हे : ०१ (म्हाडा प्रकरण)

हे देखील वाचा : Nashik Vidhan Parisahd Election : महायुतीतच बंडखोरीचे सावट; ‘दराडे-गिते’ लढत होणार की, निवडणूक बिनविरोध?

३) गोकुळ गिते
शिक्षण : बी.ए.
व्यवसाय : शेती
जंगम मालमत्ता : तीन कोटी ३९ लाख ९८ हजार ७८६
स्थावर मालमत्ता : १३ कोटी २९ लाख २२ हजार ८००
कर्ज : नऊ कोटी सहा लाख २९ हजार ५५०
सोने : १५ ग्रॅम
वाहन : नऊ (पाच कार, एक ट्रॅक्टर, तीन दुचाकी)
गुन्हे : निरंक

४) कुणाल दराडे
शिक्षण : बीई केमिकल
व्यवसाय : शेती व व्यापार
जंगम मालमत्ता : सहा कोटी २१ लाख ५६ हजार ०९७
स्थावर मालमत्ता : दहा कोटी ८८ लाख ७५ हजार ३९५
कर्ज : चार कोटी ७६ लाख ९७ हजार ६२५
सोने : १७५ ग्रॅम दागिने
वाहन : तीन (दोन कार, एक बस)
गुन्हे : ०२ (चुकीचे कर्ज व ठकबाजीचा गुन्हा)

५) गोरख बोडके
शिक्षण : बारावी
व्यवसाय : शेती
जंगम मालमत्ता : दोन कोटी चार लाख ७९ हजार
स्थावर मालमत्ता : ८५ लाख
कर्ज : ४४ लाख ५० हजार
सोने : १०० ग्रॅम दागिने
वाहन : ०२ (कार)
गुन्हे : निरंक

६) विष्णू म्हैसधुणे
शिक्षण : प्रथम वर्ष (कला)
व्यवसाय : शेती
जंगम मालमत्ता : एक कोटी ५८ लाख ६९ हजार ९०
स्थावर मालमत्ता : चार कोटी १२
लाख ४५ हजार ९७
कर्ज : ८१ लाख ६० हजार ७१४
सोने/चांदी : १००/७६० ग्रॅम दागिने
वाहन : ०२ (कार)
गुन्हे : निरंक

७) परवेझ कोकणी
शिक्षण : बारावी
व्यवसाय :- शेती, लॅन्ड
डेव्हलपर, कंत्राटदार
जंगम मालमत्ता : सहा कोटी ६४ लाख २० हजार
स्थावर मालमत्ता : १०२ कोटी ४९ लाख २० हजार
कर्ज : चार लाख
आयकर देय : एक कोटी
सोने : पाच हजार ग्रॅम;
हिरे : २७ नग
वाहन : ०१ (कार)
गुन्हे : निरंक

ताज्या बातम्या

कारवाई

Shivsena Operation Tiger: ठाकरेंच्या फुटलेल्या खासदारांवर काय कारवाई होणार? खासदारकी राहणार...

0
मुंबई | Mumbaiमहाराष्ट्राच्या राजकारणात चार वर्षानंतर पुन्हा एकदा मोठी राजकीय उलथापालथ झाली आहे. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतील नऊ खासदारांपैकी सहा खासदार हे बंडखोरी करून वेगळा...