पंचवटी | प्रतिनिधी | Panchvati
म्हसरूळ पोलीस ठाण्याच्या (Mhasrul Police Station) हद्दीतील सुयोजित गार्डन परिसरात सकाळच्या वेळी फिरण्यासाठी गेलेल्या एका तरुणीशी गैरवर्तन केल्याची गंभीर घटना उघडकीस आली आहे. अज्ञात इसमाने धमकावून तरुणीकडून जबरदस्तीने झाडांना पाणी घालून घेतल्यानंतर तिचा विनयभंग केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी म्हसरूळ पोलिसांत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
हे देखील वाचा : Ashok Kharat Crime News : ‘नो चेक, ओन्ली कॅश’; नाशिकचा ‘एप्स्टीन’ खरातला धनादेशावर अविश्वास
पोलिसांच्या माहितीनुसार, फिर्यादी तरुणी तिच्या मैत्रिणीसह २९ मार्च रोजी सकाळी साडेनऊ ते साडेदहाच्या दरम्यान सुयोजित गार्डन परिसरात (Suyojit Garden Area) फिरण्यासाठी गेली होती. त्यावेळी एक अनोळखी व्यक्ती त्यांच्या जवळ येऊन “येथे बसू नका, येथे गुन्हे घडतात. बसलात तर फोटो काढून पोलिसांकडे देईन,” अशी धमकी दिली. यानंतर संबंधित व्यक्तीने शिवीगाळ करत तरुणीला जबरदस्तीने परिसरातील झाडांना पाणी घालण्यास भाग पाडले. त्यानंतर त्याने अश्लील वर्तन करत तिचा विनयभंग केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकारामुळे घाबरलेल्या तरुणीने तत्काळ म्हसरूळ पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली.
हे देखील वाचा : Ashok Kharat Case : नीलम गोऱ्हे देखील खरातला भेटल्या, नाशिकच्या पाथर्डी फाटा परिसरातील हॉटेलमध्ये…; तृप्ती देसाईंच्या आरोपाने खळबळ
संशयित (Suspected) आरोपी सडपातळ बांध्याचा व सावळ्या वर्णाचा असून त्याने काळा शर्ट, काळी पॅन्ट आणि खाकी रंगाचे बूट परिधान केले होते. तसेच त्याने चेहऱ्यावर काळा मास्क व गळ्याभोवती मफलर गुंडाळून आपली ओळख लपवण्याचा प्रयत्न केला होता. या प्रकरणी पोलिसांनी विनयभंग तसेच पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला असून पुढील तपास उपनिरीक्षक श्रीमती तुरे करत आहेत. आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी पथके तयार केली असून परिसरातील नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
हे देखील वाचा : Nashik Accident News : मद्यधुंद कारचालकाने तिघांना उडवले; तरुणासह दोन डिलिव्हरी बॉय जखमी
सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
म्हसरूळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोठ्या प्रमाणावर गार्डन्स असल्यामुळे या परिसरात शालेय वयातील मुला-मुलींची वर्दळ अधिक असते. या ठिकाणी घडणाऱ्या घटनांच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. गार्डन्सची संख्या मोठी असल्याने प्रत्येक ठिकाणी सातत्याने पोलीस गस्त ठेवणे यंत्रणेला कठीण ठरत आहे. त्यामुळे अशा घटनांना आळा घालण्यासाठी पालकांनीही अधिक जागरूक राहणे आवश्यक आहे. मुलं शाळेत गेल्यानंतर त्यांचा वेळ कसा आणि कुठे जात आहे, याची शहानिशा करणे तसेच त्यांच्यावर योग्य लक्ष ठेवणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त होत आहे.
हे देखील वाचा : Nashik News : आयुक्तालयात बदल्यांचे वारे; महत्त्वाच्या ठाण्यांच्या ‘प्रभारी’ पदासाठी ‘लॉबिंग’




