Tuesday, April 14, 2026
Homeक्राईमNashik Crime News : 'कॉर्पोरेट जिहाद' नंतर कंपनीला जाग; संशयित कर्मचाऱ्यांचे निलंबन

Nashik Crime News : ‘कॉर्पोरेट जिहाद’ नंतर कंपनीला जाग; संशयित कर्मचाऱ्यांचे निलंबन

अंतर्गत चौकशी

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

शहरातील नामांकित बहुराष्ट्रीय आयटी कंपनीत (IT Company) महिला आणि तरुणींच्या लैंगिक शोषणासह धर्मांतराचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस येताच संशयित कर्मचाऱ्यांवर कंपनीने (Suspected Employees) कारवाई केली आहे. कंपनी व्यवस्थापनाने अंतर्गत चौकशी पूर्ण होईपर्यंत संबंधित सर्व संशयितांना निलंबित केले आहे.

- Advertisement -

हे देखील वाचा : Nashik MHADA Fraud : म्हाडा घरकुल फसवणूक प्रकरणाच्या चौकशीसाठी SIT स्थापन; आयुक्त गेडाम-कर्णिक यांच्यासह सहा जणांचा समावेश

मुंबईनाका पोलीस ठाण्याच्या (Mumbai Naka Police Station) हद्दीत असलेल्या या कंपनीत गेल्या चार वर्षांपासून कार्यरत असलेल्या महिला व मुलींचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी पुण्यातील एचआर हेडसह एकूण सात संशयितांविरोधात विनयभंग आणि धर्मांतराचा प्रयत्न केल्याप्रकरणी तब्बल नऊ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलिसांनी या सर्व संशयितांना अटक केली आहे.

हे देखील वाचा : Ashok Kharat Case : खरात प्रकरणात ईडीची नाशिकसह ११ ठिकाणी छापेमारी; मिरगाव जवळील फार्म हाऊसवरही सर्च ऑपरेशन

आता कंपनीने अधिकृत निवेदन प्रसिद्ध केले आहे. “आमच्या कंपनीचे कोणत्याही प्रकारच्या छळवणूक आणि अत्याचाराविरोधाच झिरो टॉलरन्स धोरण स्विकारले आहे. चौकशीच्या फेऱ्यातील कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. कंपनीने या प्रकरणाची सखोल अंतर्गत चौकशी सुरू केली आहे. शहर पोलिसांसह (City Police) गुन्हेशाखेस सहकार्य करत आहोत, असे पत्रात नमूद केले आहे.

हे देखील वाचा : Ashok Kharat Case : भोंदू खरातला तिसऱ्या गुन्ह्यात ‘इतक्या’ दिवसांची न्यायालयीन कोठडी

चैनानीची हजेरी

या प्रकरणातील मुख्य संशयितांपैकी एक असलेल्या चैनानीला अटक केल्यानंतर, आज (दि. १३) तिला पुन्हा न्यायालयात हजर केले जाणार आहे. पोलीस कोठडीत तिने नेमके काय खुलासे केले आणि या साखळीत आणखी कोणाचा सहभाग आहे का, याची माहिती आज न्यायालयासमोर येण्याची दाट शक्यता आहे. या सुनावणीकडे आता संपूर्ण शहराचेलक्ष आहे.

हे देखील वाचा : Ashok Kharat Crime : खरातच्या अड्ड्यातून ‘मळकट द्रव्य’ जप्त; न्यायालयीन कोठडी की पुन्हा कोठडी? आज ‘व्हीसी’द्वारे फैसला

ताज्या बातम्या

Onion Rate : राहाता बाजार समितीतील कांद्याचा वाचा भाव

0
राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata मंगळवारी राहाता बाजार समिती (Rahata Market Committee) कांद्याला प्रतिक्विंटल ला सर्वाधिक 1300 रुपये भाव मिळाला. मंगळवारी बाजार समिती 3329 गोण्यांची...