Thursday, May 8, 2025
Home Blog Page 12313

रिलायन्स जिओची 39 टक्क्यांपर्यंत दरवाढ; तरीही प्रतिस्पर्ध्यां पेक्षा 15-25 टक्के कमी किंमत

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

मुंबई:

अब्जाधीश मुकेश अंबानीची रिलायन्स जिओ आपल्या सर्व योजनांमध्ये 6 डिसेंबरपासून मोबाइल कॉल व डेटा शुल्क 39 टक्क्यांनी वाढवणार आहे, जे प्रतिस्पर्धींपेक्षा 15 ते 25 टक्क्यांनी स्वस्त असेल. या सर्व योजनांमध्ये दररोज किमान 1.5 जीबी डेटा आणि ऑफनेट कॉलची संख्या वाढविली जाईल, असे कंपनीने एका निवेदनात म्हटले आहे. या आठवड्याच्या सुरूवातीला प्रतिस्पर्धी भारती एअरटेल आणि व्होडाफोन आयडिया लिमिटेडने वाढविलेल्या तुलनेत दर वाढीला 300 टक्के अधिक लाभ देण्याचे म्हटले आहे.

01 डिसेंबर 2019च्या निवेदनात जीओकडून ऑल इन वन प्लॅनची घोषणा करण्यात आली. या योजनेत जियो ग्राहकांना 300 टक्क्यांपर्यंत अधिक लाभ देईल. या योजना 6 डिसेंबर 2019 पासून लागू होतील असे जिओने एका निवेदनात म्हटले आहे. कंपनीने 1 डिसेंबर रोजी मोबाइल प्लॅनचे दर 40 टक्क्यांपर्यंत वाढवण्याची घोषणा केली आहे. नव्या टॅरिफ प्लॅननुसार जिओ ग्राहकांना 84 दिवसाच्या वैधतेसाठी  555 रुपये आणि दिवसाला 1.5 जीबी डेटा देणार आहे जो पूर्वीच्या रु. 399 च्या प्लॅनपेक्षा 39 टक्क्यांनी जास्त फायदेशीर आहे.  कंपनीने 153 रुपयांच्या योजनेची किंमत वाढवून 199 रुपये केली आहे. 198 रुपयांचा प्लॅन 249 रुपये; 299 रुपयांचा प्लॅन 349 रुपये; 349 रुपयांचा प्लॅन 399 रुपये; 448 रुपयांचा प्लॅन 599 रुपये; 1,699 रुपयांचा प्लॅन 2199 रुपये योजना, तर 98 रुपयांचा प्लॅन 129 रुपये असे दर वाढवले आहेत

प्रतिदिन 1.5 जीबी डेटा देणारी 28 दिवसांची वैधता असणारा 199 रुपयांचा प्लॅन प्रतिस्पर्धी कंपन्यांपेक्षा 25 टक्के अधिक स्वस्त आहे कारण हे सर्व फायदे प्रतिस्पर्धी कमान्यांकडे रु. 249 ला उपलब्ध आहेत. भारती एअरटेल आणि व्होडाफोन आयडियाने 3 डिसेंबरपासून मोबाइल सेवा दर 50 टक्क्यांपर्यंत वाढविले आहेत. रिलायन्स जिओच्या नवीन योजना बाजारातील विश्लेषकांच्या अपेक्षेनुसार असून प्रतिस्पर्ध्यांच्या तुलनेत कंपनी त्यांची किंमत कमी घेईल.

“आम्हाला वाटते की जियो बोलत असलेल्या वाढीव 300 टक्के फायदा हा अधिक डेटा भत्ता देऊन आहे. या वाढीनंतरही जिओ प्रतिदिन 1.5 जीबी पर्यंत राहील असा आमचा विश्वास आहे. बँक ऑफ अमेरिका मेरिल लिंचने म्हटले आहे की, सध्याच्या ऑपरेटरंपेक्षा 15-20 टक्के स्वस्त आहे. दूरसंचार कंपन्यांनी मोबाइल दर वाढवण्याच्या निर्णयावर यावर्षी 24 ऑक्टोबरला सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे पालन केले आहे. या सेवा प्रदात्यांच्या कमाईतून मिळणारया महसुलाच्या हिशोबाची सरकारची पध्दत कायम आहे. गेल्या महिन्यात व्होडाफोन आयडियाने सप्टेंबरच्या तिमाहीत सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर उद्भवलेल्या उत्तरदायित्वासाठी 50,921 कोटी रुपयांचे समेकित नुकसान झाले आहे.

धरणगाव : गटशिक्षणाधिकारी अशोक बिऱ्हाडे यांचा मरणोत्तर नेत्रदानाचा संकल्प

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

धरणगाव ( प्रतिनिधी)

तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी अशोक बिऱ्हाडे यांनी त्यांच्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला मरणोत्तर नेत्रदानाचा संकल्प केला आहे.

वाढदिवशी मरणाची कल्पना खरं तर अनेकांना चमत्कारिक वाटू शकते. मात्र, बिऱ्हाडे यांनी प्रबोधनाची कास धरत एक अभिनव संकल्प केला आहे.

विधायक कार्याचा उपदेश किंवा भाषणातून पुरस्कार करण्याऐवजी ते त्यांनी स्वतः कृतीतून समोर ठेवले आहे.

कर्तव्यदक्ष गटशिक्षणाधिकारी म्हणून ख्याती असलेले समाजाप्रती जाण असलेले उत्तम मार्गदर्शक अशोक बि-हाडे तालुक्यात सुपरिचित आहेत.

६ डिसेंबर रोजी त्यांचा वाढदिवस आहे, वाढदिवसाचे औचित्य साधून त्यांनी मरणोत्तर नेत्रदानाचा संकल्प केला असून एक नवा आदर्श घालून दिला आहे.

पुनतगावात वाळू तस्करी करणारी बोट उदध्वस्त महसुल विभाग व ग्रामस्थांची कारवाई

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

पाचेगाव | वार्ताहर

नेवासा तालुक्यातील गुरुवारी सकाळी अकरा वाजता महसुल विभागाने पुनतगाव बंधाऱ्या शेजारी कारवाई करत एक बोट (तराफा) उदध्वस्त केली. या कारवाई दरम्यान एक तराफा पसार करण्यात वाळू तस्कर यशस्वी झाले. या कारवाईत वाळू तस्करांचे अंदाजे चाळीस हजार रूपायाचे नुकसान झाले. सदर कारवाईने वाळू तस्करांचे धाबे दणाणले आहे.

प्रवरा नदीपात्रात पाणी असल्याने वाळू उचलण्यासाठी जागा नसल्यामुळे बोटीचा(थर्माकॉल तराफा)चा वापर केला जात आहे. महसूल विभाग आणि पुनतगाव ग्रामस्थ यांनी संयुक्त कारवाई केली.

इंदिरानगर परिसरात घरफोडी; ८० हजार रुपयाचा एवज लंपास

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

इंदिरानगर | वार्ताहर

बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी 80 हजार रुपयाचा एवज चोरून नेल्याची घटना सिद्धिविनायक हाऊसिंग सोसायटी येथे घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शशिकांत ठाकरे (वय 56, रा. बंगला नंबर 19 सिद्धिविनायक हौसिंग सोसायटी, इंदिरानगर ) हे 30 नोव्हेंबर ते 4 डिसेंबर पर्यंत बाहेरगावी गेले होते.

त्याच दरम्यान अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंगल्याचे कुलूप तोडून 55 हजार रुपयांचे सोने व रोख तीस हजार रुपये असा एकूण 80 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. या प्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात भा. द. वि. कलम 380, 454, 45 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक बाकले करीत आहेत.

चौसाळे ग्रामपंचायत सरपंच पदी भास्कर जोपळे

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

चौसाळे | वार्ताहर

दिंडोरी तालुक्यातील चौसाळे ग्रुप ग्रामपंचायतीत नुकतीच सरपंच पदाची निवडणूक झाली त्यात भास्कर यशवंत जोपळे यांची निवड झाली आहे. ग्रामपंचायतचे सरपंच कै. पोपट हिरामण तुंगार हे आजारपणा मुळे मयत झाल्यामुळे सरपंच पदाची रिक्त जागा झाली होती. पिंगळवाडी येथिल सदस्य कांताबाई पंडीत भरसठ ह्या पण मयत झाल्या मुळे दोन सदस्य पदाची पोट निवडणूक लागली परंतु एक हि उमेदवार नी फार्म न भरल्यामुळे सात सदस्य मधे सरपंच पदाची निवडणुक घेण्यात आली.

सरपंच पदी भास्कर जोपळे, मथाबाई जाधव, चंद्रभागाबाई तुंगार, हिरामण गावित, वसंत भरसठ, मिराबाई चौधरी, या सहा उमेदवारांनी अर्ज केले होते. त्यात मथाबाई जाधव व चंद्रभागाबाई तुंगार यांचे अर्ज बाद झाले. वसंत भरसठ, मिराबाई चौधरी यांनी माघार घेतली. सरपंच पदासाठी भास्कर जोपळे व हिरामण गावित यांचे अर्ज होते. भास्कर जोपळे यांना बहुमत असल्याने सरपंच पदी निवड करण्यात आली.

यावेळी निवडणूक आधिकारी राठोड, ग्रामसेवक जे.एच पवार यांच्या उपस्थितीत सरपंच निवड पार पडली. उपस्थितीत ग्रामस्थांनी सरपंच भास्कर जोपळे यांचे अभिनंदन केले.

या तर चोराच्या उलट्या बोंबा: अँड. आशिष शेलार

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

मुंबई:

आपल्या सह सोबत आलेल्या अपक्ष आमदारांंना आश्वासन देऊन ठेवली. प्रत्यक्षात सरकार स्थापन होऊन आठ दिवस होत आले तरी साधे खातेवाटही करू शकले नाही. दिलेली आश्वासने पुर्ण करु शकत नाही. त्यामुळे तिघाडीच्या आमदारांमधे अस्वस्थता आहे. ती लपविण्यासाठी आता भाजपच्या नावाने उलट्या बोंबा मारल्या जात आहेत. या चोराच्या उलट्या बोंबा आहेत, अशा शब्दांत राज्याचे माजी शालेय शिक्षण मंत्री आमदार अँड. आशिष शेलार यांनी तिघाडीचा जोरदार समाचार घेतला आहे.

भाजपातील डझनभर आमदार फुटणार असे धादांत खोटे आणि वास्तवाशी कुठलाही संबंध नसलेले वृत्त आज सुत्रांच्या हवाल्याने काही वर्तमानपत्रात प्रसिद्ध करण्यात आले आहे. ही निव्वळ अफवा आहे. तिघाडीच्या नेत्यांकडून अशा अफवा पसरवण्यात येत आहेत. चोराच्या उलट्या बोंबा मारणे सुरु आहे. भाजप मध्ये अन्य पक्षातून आलेले असो वा मुळ भाजपचे असलेले आमदार सर्व पक्ष शिस्त पाळणारे आहेत. त्यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वावर पुर्ण विश्वास आहे. किंबहुना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री म्हणून जे काम केले त्यामुळेच आश्वासक, प्रभावी, पारदर्शी नेतृत्वावर विश्वास ठेऊन अन्य पक्षातून अनेक आमदार भाजप मध्ये आले.

सत्ता स्थापनेच्या काळात भाजपला या सर्व आमदारांवर विश्वास असल्यानेच त्यांना तिघाडीच्या आमदारांप्रमाणे डांबून ठेवावे लागले नाही. कुणीही कुठल्याही प्रकारे पक्ष शिस्त मोडली नाही. तिन्ही पक्षांनी आमदारांना डांबून ठेवले. मोठमोठी आश्वासनं दिली. प्रत्यक्ष आता काहीच घडत नाही. त्यामुळे त्यांच्याच आमदारांंमधे अस्वस्थता आहे.सध्या तिघाडीचे जे सुरु आहे ते पाहून भाजपमधे अन्य पक्षातून आलेले आमदार म्हणत आहेत की, बरे झाले आम्ही भाजप मधे आलो. आम्ही 105 आमदार संपूर्ण पणे देवेंद्र फडणवीस यांच्या पाठीशी असून अनेक लोककल्याणकारी प्रकल्प बंद करून विनाशाचे काम करणाऱ्या या सरकारला लोकांच्या प्रश्नांवर आम्ही सळोकी पळो करुन सोडू, सत्तेची विनाशकारी तिघाडी केलेल्या या पक्षांनी जरा आपल्या पक्षातील आमदारांच्या मनात नेमके काय चाललेय ? त्याचा एकदा कानोसा घ्यावा, असा सल्ला ही आमदार अँड आशिष शेलार यांनी प्रसिद्धी पत्रकात दिला आहे.

जळगाव : प्रा.के.वाय.देशमुख यांची गळफास घेवून आत्महत्या

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

जळगाव । प्रतिनिधी

नूतन मराठा महाविद्यालयातील बायो विभागाचे प्रमुख प्रा.के.वाय.देशमुख (किशोर यादवराव देशमुख, वय 58, चांदनी चौक, शिव कॉलनी) यांनी गळफास घेवून राहत्या घरी वरच्या मजल्यावर गुरुवारी सकाळी 10 ते 11 वाजेदरम्यान आत्महत्या केली.

शारीरिक व्याधीच्या त्रासामुळे मनस्थिती खचल्याने त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले, असे त्यांनी आत्महत्येपूर्वी लिहलेल्या चिठ्ठीतून लक्षात येते.

या घटनेप्रसंगी घराच्या तळमजल्यावर सर्व जण होते. मुंबईला शिकत असलेला मुलगा आणि अमेरिकेत नोकरी करणारी विवाहित मुलगी देखील घरी आलेली होती.

सकाळी वरच्या मजल्यावर देवपूजा केल्यानंतर त्यांनी स्वत:चा जीवनप्रवास संपवला. बराच वेळ झाला तरी ते जेवणाला तळमजल्यावर आले नाही. कारण नेहमीप्रमाणे देवपूजेनंतर ते जेवण करुन महाविद्यालयात 10.30 वाजता जात असत. त्यामुळे त्यांना बोलवण्यासाठी त्यांची पत्नी कुमुदिनी वरच्या मजल्यावर गेल्या असता प्रा.देशमुख यांनी साडीच्या सहाय्याने गळफास घेतल्याचे आढळले. त्यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले. परंतु, त्यांचा मृत्यू झालेला असल्याचे वैद्यकीय सुत्रांनी जाहीर केले.

याबाबत वैद्यकीय अधिकारी डॉ.विजय कुरकुरे यांनी खबर दिली. त्यावरुन रामानंद पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झाली. प्रा.देशमुख यांच्या पश्चात भाऊ, पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. ते नायगाव (ता.यावल) येथील मूळ रहिवासी आहेत. ते जुलै महिन्यात सेवानिवृत्त होणार होते.

तानाजी चित्रपटातील वादग्रस्त प्रसंग वगळण्यासाठी संभाजी ब्रिगेड आक्रमक; सिटी सेंटर मॉल येथे दिले निवेदन

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

नाशिक | प्रतिनिधी

तानाजी चित्रपटात छत्रपती शिवरायांचा इतिहास चुकीचा दाखविला गेला आहे. चित्रपटातील वादग्रस्त प्रसंग वगळण्यासाठी संभाजी ब्रिगेड आक्रमक झाली असून हा भाग तात्काळ वगळावा अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा देत नाशिक येथील सिटी सेंटर मॉल येथील चित्रपट गृहाच्या संचालकास निवेदन दिले.

दरम्यान, नेहमीच बहुजन महापुरुषांच्या बाबतीत सजग राहणाऱ्या संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांना चित्रपटात चुकीचा इतिहास दाखविला जात असल्याचे समजताच संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष डॉ. स्वप्निल इंगळे, जिल्हा सचिव नितिन रोठे पाटील, महानगर प्रमुख प्रफुल्ल वाघ, जिल्हा सरचिटणीस विक्रम गायधनी, जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हा कार्याध्यक्ष रोहिणी सोनवणे यांनी आक्रमक पवित्रा घेत सिटी सेंटर मॉल येथील चित्रपटगृहाच्या मालकास या चित्रपटात काही दृष्य चूकीची दाखविली जात असून तात्काळ हा भाग वगळावा अशी समज दिली व हा वादग्रस्त भाग न वगळल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा दिला यास आपण जबाबदार राहणार असा इशारा देत निवेदन दिले.

यावेळी जय जिजाऊ, जय शिवराय, छत्रपती शिवाजी महाराज की जय, शुर सरदार तानाजी महाराज की जय, बहुजन महापुरुषांची
बदनामी थांबविलीच पाहिजे अशा घोषणा देत सिटी सेंटरचा परिसर दणाणुन गेला होता.

चित्रपटात दाढीवाली व्यक्ति बसली असून तो व्यक्ति शिवाजी महाराजांना लाकडी वस्तु फेकून मारतात हा प्रसंग चुकीचा आहे. यात शिवरायांची बदनामी होत आहे.

-डॉ स्वप्निल इंगळे, जिल्हाध्यक्ष संभाजी ब्रिगेड

चित्रपटात अभिनेत्री काजोलच्या तोडूंन शिवरायांची तलवार जेव्हा चालते तेव्हा ब्राम्हणांचे जानवे सुरक्षित राहते असे वाक्य आहे. मात्र शिवरायांचे राज्य हे अठरा पगड़जातींचे राज्य होते. या चित्रपटात संकुचित दाखवित बदनामी केली आहे ही चूकीची दृष्य वगळावी अन्यथा चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही.

-नितिन रोठे पाटील,जिल्हा सचिव संभाजी ब्रिगेड

लासूर (ता.चोपडा) प्रा. आरोग्य केंद्राच्या आशा गाजरे यांना ‘फ्लोरेन्स नाईटिंगेल’ पुरस्कार

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

जळगाव –

जिल्ह्यातील लासूर ता.चोपडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आशा गाजरे यांना उल्लेखनीय योगदानासाठी राष्ट्रपती कोविंद यांच्या हस्ते आज ‘फ्लोरेन्स नाईटिंगेल राष्ट्रीय पुरस्कार’ प्रदान करण्यात आला.

पुरस्कार वितरण प्रसंगी केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री, राज्यमंत्री उपस्थित होते.

मुरमाड जमिनीवर फुलविली केशर आंंब्याची बाग

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

सुरगाणा | वाजिद शेख 

योग्य मार्गदर्शन मिळाल्यानंतर जिद्द चिकाटी परिश्रम करण्याची तयारी असल्याच्या मोठ्या उतारारीवर पडीत मुरमाड जमिनीवर ही केसर आंब्याची हिरवीगार बाग फुलविता येते,हे सुरगाणा तालुक्यातील भदर येथील शेतकरी रमेश भिका थोरात व त्याच्या पत्नी भदर गामपंचायतचे संरपच झंपाबाई थोरात व त्याच्या कुटुंबियांनी दाखवुन दिले.सुरगाणा तालुक्यातील आदिवासी शेतक-यासमोर थोरात यांनी एक आदर्श उभा केला आहे.

सुरगाणा शहरापासून अवघ्या चार किलोमीटर अंतरावर रमेश थोरात यांची शेतजमिण आहे, त्याच्याकडे असलेल्या एकुन मुरमाड जमिनी पैकी मोठा उतार असलेली एक ते दिड एकर जमीन मुरमाड असल्याने वर्षानुवर्षा पासुन पंडीत होती.कोणतेही पिक घेतले जात नव्हते. साधारण दहा वर्षांपासून त्याच्या घरी मोहमाळ येथिल शिक्षक काशिनाथबाबा गागुडे सर याच्या सोबत संपर्क व येणे-जाने झाले.गागुडे व शेतकरी थोरात या दोघांची मुरमाड जमिनीवर केशर आब्याची बाग लावण्यास रमेश थोरात व पत्ती झंपाबाई थोरात.

या दोघांना जमिनीवर केशरआब्याची बाग लावण्यास सल्ला दिला. मुरमाड जमिनीवर काय आब्याची रोपे कशी वाढतील अशी थोरात याना शंका होती. माञ गागुडे सर यानी त्याना उभारी दिली. अखेर थोरात यांनी गुजरात राज्यातून ६०-७० रूपये दराने केसर आब्याची ७५० रोपे खरेदी केली व पडीत मुरमाड जमिनीवर साधारण आठ बाय दहा फुटांच्या अंतरावर लावली. पाण्याची व्यवस्था ठिबक सिचनने करण्यात आली.

संपूर्ण लागवडीपासुन ते आतापर्यंत मार्गदर्शन महात्मा फुले कृषी विद्यापिठ कांदा व दाक्ष संशोधन केंद पिपळगाव बंसवत येथिल कमलाकर जाधव, विजय धुम, रामदास खैरनार, दिलीप गवारे हे थोरात याच्या शेतात जाऊन मार्गदर्शन नेहमी करत राहतात. विशेष म्हणजे घेतलेल्या योग्य सल्यामुळे योग्य मार्ग दर्शन व मेहनती मुळे सर्वच्या सर्व झाडे केसर आंब्याची रोपे डौलाने उभी राहिली.