Sunday, June 14, 2026
Homeक्रीडाIPL 2026 : आज गुजरात टायटन्स विरुद्ध पंजाब किंग्ज लढत; कोण मारणार...

IPL 2026 : आज गुजरात टायटन्स विरुद्ध पंजाब किंग्ज लढत; कोण मारणार बाजी?

नवी दिल्ली | वृत्तसेवा | New Delhi

इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएल (IPL) २०२६ च्या हंगामात आज (मंगळवारी) न्यू चंदीगड (Chandigarh) येथील मुल्लानपुर मैदानावर सायंकाळी ७ वाजता गुजरात टायटन्स आणि पंजाब किंग्ज (Gujarat Titans and Punjab Kings) यांच्यात सामना होणार आहे. गुजरातचे कर्णधारपद शुभमन गिलकडे तर श्रेयस अय्यरकडे पंजाब किंग्ज संघाचे कर्णधारपद असणार आहे.

- Advertisement -

हे देखील वाचा : Rupali Chakankar : रुपाली चाकणकरांना खरात प्रकरणात अद्याप SIT ची नोटीसच नाही! चौकशीच्या केवळ चर्चाच

गतवर्षी अंतिम सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने (Royal Challengers Bangalore) ६ धावांनी पंजाब किंग्ज संघाला पराभूत करून इतिहास रचला होता. तर मुंबई इंडियन्सने गुजरात टायटन्स संघाला एलिमिनेटर सामन्यात पराभूत केले होते. त्यामुळे यंदाच्या हंगामात विजयी सलामी देण्यासाठी दोन्ही संघ सज्ज असणार आहेत.

हे देखील वाचा : Ashok Kharat Case : ‘क्राइम सीन’ रिक्रिएट; भोंदू खरातच्या कार्यालयातील झाडाझडतीत SIT ला काय-काय मिळालं?

दरम्यान, आयपीएलच्या स्पर्धेमध्ये दोन्ही संघांत ६ सामने (Match) खेळले गेले असून, दोघांनी ३-३ सामन्यात विजय संपादन केला आहे. अखेरच्या ४ सामन्यांचा निकाल पाहिल्यास दोन्ही संघ २-२ सामन्यात विजयी झाले आहेत. त्यामुळे आजच्या सामन्यात कोणता संघ (Team) बाजी मारतो याकडे, सर्वांचे लक्ष लागून आहे.

हे देखील वाचा : Ashok Kharat Crime News : खरातच्या मोबाईलचा ‘क्लोन’ तयार; बड्यांची गुपिते उघडणार, पंटरही रडारवर

या खेळाडूंवर असेल नजर

जॉस बटलर, रशीद खान, श्रेयस अय्यर, शुभमन गिल

हे देखील वाचा : Ashok Kharat Crime News : ‘नो चेक, ओन्ली कॅश’; नाशिकचा ‘एप्स्टीन’ खरातला धनादेशावर अविश्वास

ताज्या बातम्या

शेत रस्त्याच्या वादातून तरुणास मारहाण

0
मानूर | वार्ताहर Manur कळवण तालुयातील भादवण शिवारात शेतजमिनीच्या वहिवाट रस्ता वादातून एका तरुणासह त्याच्या वडिलांना मारहाण केली. यामुळे मारहाण झालेल्या युवकाने विष घेत आत्महत्या...